|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » आता पी.व्ही सिंधूवर येणार चित्रपट

आता पी.व्ही सिंधूवर येणार चित्रपट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले रौप्यपदक मिळवून देणाऱया पी.व्हि सिंधूवर आता चित्रपट येणार आहे. अभिनेता आणि निर्माता सोनू सूद या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

याबाबत माहिती देताना सोनू म्हणाल की, या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मी खुपच उत्सुक आहे. सिंधू अशी मुलगी आहे, जिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. सिंधूकडे पाहून कळतं की, एखादा माणूस फक्त मोठी स्वप्न बघत नाही तर प्रत्यक्षातही आणू शकतो. पी. व्हि सिंधू हिनेही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, ‘मला आनंद होत आहे की माझा इतका सन्मान केला जात आहे. सोनू सूद यांच्या टीमने माझ्यावर चित्रपट बनवण्यासाठी जी मेहनत केली, ते पाहून मला सन्मनि झाल्याचा आनंद मिळत आहे. त्यांनी या चित्रपटासाठी पटकथा लिहीली आहे. मला विश्वास आहे की, हा चित्रपट पहिल्यानंतर तरूणांनी स्वप्न पाहावसं वाटेल. आपणही देशासाठी काहीतली करावे यासाठी प्रेरणा मिळेल.

 

Related posts: