|Thursday, February 20, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

अन्नपूर्णेचा अपमान हा सर्वात मोठा शाप

बुध. दि.3 ते 9 मे 2017

अन्नाचा शाप नाहिसा होण्यासाठी पंचमहायज्ञ करावा असे शास्त्रात सांगितलेले आहे. त्याचा सविस्तर विधी पुढील काही भागात सर्व समावेशक पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला जाईल. पशू पक्षी व जनावरे यांना जर अन्नदान केले तर त्यातून कमाईला उर्जितावस्था येते. ज्यावेळी संकटे येतील. त्यावेळी घेण्याच्या तरी रुपाने वैश्विक शक्ती आपले रक्षण करत असते, अपघात होत नाहीत किंवा त्यातून सहिसलामत सुटका होते. अन्नदानाने अनेक गंभीर दोष नष्ट होतात, रहाती वास्तू शुद्ध होते, अधिकाधिक शक्ती वाढते त्यासाठी मंगलकार्यात व प्रासंगिक वेळी अन्नदान करण्याची प्रथा आहे. अन्नदानाबरोबर रहात्या वास्तूत जर वैदिक मंत्र उच्चारण चालू ठेवल्यास त्याचा उपयोग होतो. जेवणावळी वा बुफे पार्टी तथा पंक्तीत बऱयाच अन्नाची नासाडी होते. त्यानेही गंभीर दोष निर्माण होतात. स्वत:च्या भल्यासाठी एखाद्याविषयी खोटेनाटे सांगून त्याचा नोकरी वा व्यवसाय बंद करण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. कोणाच्याही पोटावर पाय देणे यासारखे दुसरे पाप नाही. कालांतराने त्याचे अनि÷ परिणाम भोगावे लागतात. ज्या घरात अथवा देवळात अन्नदान चालू असते तेथील देवता जागृत होतात व तेथे उर्जितावस्था प्राप्त होते. सद्हेतूने अन्नदानाचा संकल्प केल्यास देवताही अदृश्य रुपाने आपल्याला मदत करतात. याबाबत समर्थ रामदासस्वामींचे ‘मनाचे श्लोक’ हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या मोठय़ा कार्यक्रमासाठी कोणतीही शासकीय रसद पोहोचलेली नसते. दुसऱयादिवशी तरी अन्नदानाचा संकल्प असतो, बाहेरगावी गेलेले समर्थ आपल्या गृही परतल्यावर त्यांना हे समजते. तेव्हा त्यांनी कल्याणस्वामींना बोलावले व पहाटे 5 पर्यंत 205 श्लोक असलेले मनाचे श्लोक सांगितले. सर्व शिष्यांना मनाचे श्लोक म्हणत भ्रमण करण्यास सांगितले. काही वेळातच शिवाजी महाराजांकडून रसद आली आणि अपेक्षेपेक्षाही जास्त लोकांकडून शिधा मिळाली. याचे कारण समर्थांची रामभक्ती व अन्नदानाचा शुभसंकल्प, हेच म्हणता येईल. आपण जे पैसे कमावतो त्यातील थोडा भाग तरी अन्नदानासाठी खर्च करावा. त्यामुळे कमविलेल्या पैशाला शांतता लाभते व घरात सुखसमृद्धी येऊ लागते. पंचमहायज्ञ सर्वांनाच जमेल, असे नाही परंतु प्रयत्न केल्यास काहीही अशक्मय नाही. या यज्ञाने आर्थिक स्थिती मात्र लागेल. अन्नाचा जितका मान ठेवाल त्याप्रमाणात तुमची प्रगती होत जाते काही घरात अन्नधान्याची नासाडी मोठय़ा प्रमाणात होते हे कटाक्षाने टाळा.

(क्रमश:)

मेष

धनस्थानी मंगळ असल्याने खर्च वाढतील. चंद्र, शनिचा शुभयोग दीर्घकालीन समस्यांवर मार्ग दाखवेल. राहू, केतूचा योग संततीबाबत काळजी घेण्यास सुचवित आहे. राशीतच असलेली त्रिमूर्ती काही बाबतीत तडकाफडकी निर्णय घेण्यास भाग पडेल. कोणतीही शासकीय कामे या आठवडय़ात केल्यास अडचणी येणार नाहीत. कामाचा पसारा वाढेल. मन व बुद्धी शांत ठेवून वागणे आवश्यक.


वृषभ

चंद्र, मंगळ युतीमुळे उष्णता व पित्त प्रकोपापासून जपा. ध्यानधारणा दैवी शक्ती व अध्यात्मिक मार्गाकडे जावेसे वाटेल. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. शुभकामासाठी प्रवासयोग. हौसमौजेसाठी बराच खर्च कराल. तरुण वर्गाने प्रेमप्रकरणात पडणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा फसगत होईल. काही बाबतीत व्यवहारदक्ष रहावे लागेल.


मिथुन

तुमच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे लोकप्रियता लाभेल. नोकरी/व्यापार उत्तम चालेल. दूर गेलेली मुलेबाळांची भेट होईल. स्थावर, जागा, वास्तू या बाबतीत उत्तम योग. नोकरचाकर ठेवण्याची ऐपत प्राप्त होईल. मोठमोठय़ा लोकांच्या ओळखी होतील. जीवनात उच्च स्थिती प्राप्त करून देणारा योग. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव कमी होतील. मंगलाचे भ्रमण फालतु खर्च वाढण्याची शवयता आहे.


कर्क

वडिलोपार्जित इस्टेट मिळण्याचे योग. नोकरी व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहिल. एखाद्या क्षेत्रात उच्च दर्जा प्राप्त होईल. नेतृत्व वा पुढारीपण स्वीकारावे लागेल. सरकार दरबारी अडलेली सर्व कामे होतील. परिस्थितीमध्ये अचानक महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील. लाभस्थ मंगळामुळे संततीशी मतभेद तसेच मित्रमंडळींकडून फसवणूक होण्याची शक्मयता. सावध रहा.


सिंह

उच्च शिक्षण चालू असल्यास यश मिळेल. धार्मिक व परमार्थिक कार्यात भाग घ्याल. अंगच्या कलागुणांमुळे नावलौकिक होईल. व्यापार, उद्योग, व्यवसाय यातील स्थिती समाधानकारक राहिल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरुकृपेमुळे आर्थिक स्थिती चांगली राहून त्यात भर पडेल. मूळ पत्रिकेत जर धनसहमबिंदू  चांगला असेल तर अचानक मोठे धनलाभ संभवतात.


कन्या

संसारिक जीवनात महत्त्वाच्या घडमोडी. अडमुठय़ा व्यक्तीच्या धोरणी व्यक्तीपासून दूर रहा. अन्यथा वादाचे प्रसंग उदभवतील. आरोग्य उत्तम राहील. व्यक्तिमत्त्व आनंदी व प्रसन्न ठेवा. बऱयाच ठिकाणी नोकरी, व्यवसाय व लग्नासाठी बोलावणी येतील. वास्तुतील काही फेरबदल अनुकूल फळे देऊ लागतील. परंतु मोडतोड व फोडाफोडी केली असल्यास त्रास हेईल. शत्रू परस्पर थंड पडतील.


तुळ

राहुच्या कृपेमुळे आर्थिक लाभ होतील. वाहनसौख्य लाभेल. परंतु पाखंडी साधू, संत, बुवा, बाबा यांच्यामागे लागल्याने आर्थिक नुकसान भावंडांच्या बाबतीत फार अपेक्षा ठेवू नका. जमीन, लिखाण व कागदपत्रे याबाबत फसवणुकीचे योग दिसतात. एखादा छंद उपजिवीकेची नवी संधी मिळवून देईल. व्यवस्थापन योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भावी काळात त्याचा फायदा होईल. 8 व्या मंगळामुळे अपघात व दुर्घटना घडतात. काळजी घ्या.


वृश्चिक

सप्तमातील मंगळामुळे वैवाहिक जोडीदाराची काळजी घ्या. बुधाचे भ्रमण नोकरचाकरांशी संघर्ष घडवील. आर्थिक बाबतीत उत्तम पण काही जणांच्या विचित्र वागण्यामुळे घरातील सुखसमाधान हरविण्याची शक्मयता. लाभस्थ गुरुमुळे व्यापार उदिम जोरात चालेल. श्रीमंतांच्या ओळखीतून फायदा होईल. भाग्यवान संतती होण्याचे योग. दूरवरचे प्रवास घडतील.


धनु

चतुर्थातील शुक्रामुळे सर्व तऱहेची सुखे हात जोडून उभी राहतील. वडिलोपार्जित इस्टेट मिळेल. दयाहिन व उलटय़ा काळजाच्या व्यक्तीकडून त्रास होण्याची शक्मयता. पूर्वजांच्या पुण्याईचा सर्व क्षेत्रात उपयोग होईल. नोकरीसाठी प्रयत्न केले असतील तर यश मिळेल. एखाद्याची गेलेली नोकरी तुम्हाला मिळण्याचे योग तसेच बंद पडलेले व्यवसाय सुरू कराल.


मकर

पंचमातील मंगळामुळे कामे खोळंबण्याची शक्मयता. क्रिडा व कला इंजिनियरिंग कारखानदारीत असाल तर मोठे यश. चतुर्थातील बुधामुळे नोकरी अथवा स्थलांतराचे योग. राहती जागेत बदल होण्याची शक्मयता. शिक्षणात उत्तम यश, अवघड समस्या पटकन सुटतील. मुलाबाळांच्या काही इच्छा पूर्ण करू शकाल. राशीस्वामी अनिष्ट स्थानी असल्याने आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. परंतु दीर्घकालीन शत्रूत्व मात्र नष्ट होईल. राजकीय क्षेत्रात असाल तर सर्व बाबतीत सावध रहावे लागेल.


कुंभ

राहू, केतूच्या वाढत्या प्रभावामुळे नको त्या गोष्टींकडे मन वळण्याची  शक्मयता. लाभस्थ शनिमुळे वैभव व श्रीमंती प्राप्त  होईल. नोकरचाकरांचे  उत्तम सौख्य. चतुर्थातील मंगळामुळे कौटुंबिक सौख्यात बाधा येतील. स्थावर इस्टेटीबाबतीत अनुकूल बदल संभवतात. आईच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. शिक्षण व लिखाणात मनाजोगे यश मिळेल. शुक्राच्या कृपेमुळे गायन, वादन व संगीत यात उत्तम प्राविण्य मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.


मीन

आर्थिक स्थिती भक्कम राहील. शासकीय कामे झटपट होतील. विशेष प्रयत्न न करता धनलाभाचे योग. ज्या क्षेत्रात असाल तेथे अधिकारपद मिळण्याची शक्मयता. परदेशी जाण्याची संधी मिळाल्यास निश्चित भाग्य उजळेल. किरकोळ बाबीवरून वडिलधाऱयांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात शुभ घटनांची नोंद सुरू होईल. मंगळाचे भ्रमण शुभ असल्याने कार्यक्षमता वाढेल. भावंडांशी मतभेद होऊ देऊ नका.

Related posts: