|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी नगर परिषद कोकणात द्वितीय

रत्नागिरी नगर परिषद कोकणात द्वितीय 

प्रतिनिधी / रत्नागिरी

शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासकामे राबविणाऱया रत्नागिरी नगर परिषदेने उत्कृष्ट नगरपरिषद म्हणून कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले नगर पंचायत कोकणात अव्वल ठरली आहे.

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट नगर परिषद अभियान राबविण्यात आले होते. या अभियानामध्ये नगर परिषद स्तरावर दिल्या जाणाऱया लोकसेवांचा विचार करण्यात आला. नगर परिषदांचा प्रशासकीय कारभारामध्ये कर वसुली, जनताभिमुख सेवा, पाणीपुरवठा इतर उपक्रमांमध्ये शहर स्वच्छता, हागणदारी मुक्ती, इतर विविध उपक्रम त्याचबरोबर राबविली जाणारी विकासकामे यांचाही विचार करण्यात आला.

रत्नागिरी नगर परिषदेने या अभियानात उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही नगर परिषद कोकण विभागात दुसऱया क्रमांकास पात्र ठरली आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट नगर पालीका पुरस्कारांचे वितरण मुंबईमध्ये होणार आहे.

 

Related posts: