|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साबांखाच्या परिपत्रकला कॉंग्रेसचा विरोध

साबांखाच्या परिपत्रकला कॉंग्रेसचा विरोध 

प्रतिनिधी/ पणजी

 सार्वजनिक बांधकाम खात्याने पावसाळी पूर्व कामासाठी निविदा काढणार नाही असे परिपत्रक नुकतेच जाहीरे केले आहे. याला कॉंग्रेस पक्षाने विरोध केला असून जर पावसाळी पूर्व कामसाठी निविदा काढली नाही तर पावसाळय़ात लोकांना नाहक त्रास सहन करावे लागणार आहे. शहरातील तसेच गावातील गटारे तुंबणार आहे, असे यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 प्रत्येक वर्षी साबांखातर्फे पावसाळीपूर्व कामासाठी निविदा काढली जाते. यावर्षी सरकारची आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने खात्याने निविदा काढली जाणार नसून साबांखा कामगारांकडूनच पावसाळी पूर्व कामे करुन घेतली जाणार आहे असे परिपत्रक काढले आहे. हे चुकीचे असून पावसाळय़ात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रस्त्यवरील डाबके, गटारे ही पावसाळय़ापूर्वी साफ करणे गरजेचे आहे. सरकारची सध्या आर्थिक स्थिती कोलमडली आहे हे यावरुन दिसून येते. पावसाळय़ात अनेक शहरामध्ये गाटाऱयातील पाणी भरुन शहरे तुंबतात लोकांच्या घरामध्ये दुकानामध्ये पावसाळय़ातील पाणी घुसते. यात लाखोची नुकसान लोकांना सहन करावी लागते. जर पावसाळी पूर्व कामे वेळेवर पूर्ण झाली नाही तर लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागाणार आहे, असे कवठणकर म्हणाले.

गोवा फोरवर्ड पक्षाचा निषेध

 गोय, गोयकार व गोयकारपण म्हणून लोकांकडून मते मागणाऱया गोवा फोरवर्ड पक्षाने आपले खायचे दात दाखवून दिले आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टकडे आयात होणाऱया कोळसा विरोधात आवाज उठविणाऱया स्थानिक गोयकरांना पाठींबा न देता त्यांनी सरळ कर्नाटकांनी स्टील कंपनीला पाठींबा दिला आहे. आता त्यांना गोयकार दिसत नाही असा प्रश्न यावेळी सुनिल कवठणकर यांनी उपस्थित केला. या बंदरात आयात केल्या जाणाऱया कोळशायमुळे स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यात काम करणारे हे स्थानिक गोयकार नाही अशा वेळी गोवा फोरवर्डने स्थानिकांना पाठींबा न दर्शविता परराज्यातील कंपनीला पाठींबा दर्शविला याचा आम्ही काँगेस पक्षातर्फे निषेध करतो, असे यावेळी सुनिल कवठणकर यांनी सांगितले.

वाळपई गट कॉंग्रेस अध्यक्षपदी आशिष काणेकर

 वाळपई गट कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी आशिष काणेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष तय्यद अली खान, सचिव कुतुबुद्दीन शेख, सहसचिव राजू वरगीश, खजिनदार सरफराज खान व सहसचिव महम्मद अली खान यांची निवड करण्यात आली तर एकुण 10 सदस्य या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.