|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » योगींच्या ‘अन्नपूर्णा’ भोजनालयात 5 रुपयात थाळी

योगींच्या ‘अन्नपूर्णा’ भोजनालयात 5 रुपयात थाळी 

लखनौ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंजुरीनंतर आता राज्यात लवकरच अन्नपूर्णा भोजनालय सुरू होणार आहे. यांतर्गत सरकार गरिबांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध करणार आहे. योगींनी या योजनेला मंजुरी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. योगींनी मुख्यमंत्री पद स्वीकारताच आता राज्यात कोणीहु उपाशीपोटी झोपणार नाही अशी घोषणा केली होती. या भोजनालयात नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळेल. येथे फक्त 3 रुपयात नाश्ता आणि 5 रुपयांमध्ये जेवण मिळणार आहे. नाश्त्यात दलिया, इडली-सांबार, पोहे आणि चहा-भजी असेल, तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी, भाजी, डाळ आणि भात असणार आहे. अन्नपूर्णा भोजनालय उत्तरप्रदेशच्या सर्व तालुका मुख्यालयांमध्ये सुरू केले जाणार आहे.  शेतकऱयांच्या कर्जमाफीनंतर गरिबांसाठी घेण्यात आलेला हा दुसरा सर्वात मोठा निर्णय आहे. भोजनालय अशा ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न असेल, जेथे गरिबांची संख्या अधिक असेल.

Related posts: