|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » स्थगिती मिळवून कार्यकाल पूर्ण करण्याची योजना

स्थगिती मिळवून कार्यकाल पूर्ण करण्याची योजना 

प्रतिनिधी / लांजा

नगराध्यक्षपदाचा कार्यकाल अवघा 4 महिने बाकी असताना अपात्रतेचा निर्णय झाल्यामुळे लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.संपदा योगेश वाघधरे यांची धावपळ उडाली आहे. अपिलिय प्राधिकरणाकडे जिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाविरूध्द आक्षेप दाखल करून सुनावणी होईपर्यंत अपात्रतेला स्थगिती मिळवून घ्यावी, तेवढय़ा काळात पदावधी पूर्ण करावा, पुढचा नगराध्यक्ष आपल्याच पॅनेलचा बसवण्यासाठी मतदान करावे आणि त्यानंतर दीर्घकाळपर्यंत अपिलाच्या कामी लढत द्यावी, अशी व्युहरचना वाघधरे यांनी केल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे लांजाच्या नगराध्यक्षा सौ.संपदा वाघधरे यांना जिल्हाधिकाऱयांनी अपात्र ठरवले. या बाबतच्या चर्चा लांजा शहरात गेले आठ महिने सुरु होत्या. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.संपदा वाघधरे यांच्यावर असणारे अनधिकृत बांधकामाचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांना जिल्हाधिकाऱयांनी अपात्र ठरवले आह़े त्यांचे पती योगेश वाघधरे यांनी लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृत बांधकाम व आपल्या पतीला अनधिकृत बांधकामात सहाय्य केल्याची तक्रार नगरपंचायतीचे गटनेते सुनील कुरुप यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे 13 ऑक्टोबर 2016 रोजी केली होती. त्यानुसार लांजा नगरपंचायतीने या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला होत़ा बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपंचायत प्रशासनाकडून हे बांधकाम थांबवण्यात येऊन उभारलेले बांधकाम तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होत़े नगरपंचायतीच्या आदेशानुसार वाघधरे यांनी पत्र्याचे छप्पर असलेली इमारत पाडली होत़ी दरम्यान सुनील कुरुप यांनी तक्रार केल्याने जिल्हाधिकाऱयांनी नगरपंचायत प्रशासनाकडून बांधकामाबाबतचा अहवाल मागवला होता. अहवालानुसार नगराध्यक्ष सौ.संपदा वाघधरे अपात्र ठरल्य़ा नगराध्यक्षपदाचा चार महिन्यांचा कार्यकाल शिल्लक असतानाच संपदा वाघधरे यांना जिल्हाधिकाऱयांनी अपात्र ठरवले आहे.

कारवाई योग्यच: ऍड. गांगण

लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.संपदा वाघधरे यांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मदतीने त्या नगराध्यक्षा बनल्या होत्या व यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होत़ी मात्र पदावर बसतानाच अहंकारी वृत्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱयांना त्यांनी अपमानास्पद वागणूक देणे सुरु केल़े त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे अनेक तक्रारी गेल्या होत्य़ा कोटय़वधीचा विकासनिधी त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाकडे परत गेल्याने शहर विकासापासून 2 वर्षे मागे आल़े त्यामुळे लांजा नगराध्यक्ष अपात्र ही कारवाई योग्य असल्याचे मत नगरसेवक ऍड़ रुपेश गांगण यांनी व्यक्त केले आहे.

Related posts: