|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मल्हारपेठच्या कुस्ती मैदानात शिवाजी पाटील विजयी

मल्हारपेठच्या कुस्ती मैदानात शिवाजी पाटील विजयी 

वार्ताहर/ सुळे

मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे मॉनस्टर बॉईज यांचेवतीने जोतिर्लींग यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या लढतीत शिवाजी पाटील याने राजाराम यमगर याला चितपट करून चांदीची गदा प्राप्त केली.

द्वितीय क्रमांकाची कुस्ती विकास पाटील व सरदार सावंत व तृतीय क्रमांकाची सनिकेत राऊत व निलेश पवार यांच्यात होऊन बरोबरीत सोडवण्यात आली.

या स्पर्धेतील विजयी मल्ल पुढीलप्रमाणे :

दिग्विजय जाधव (माले), वैभव पाटील (नंदवाळ), अरुण पाटील (भामटे), अशिष बाजीराव पाटील (सावर्डे), नवनाथ गोटम (तांदूळवाडी), संकेत विश्वास खाडे (सावर्डे), अल्ताफ पठाण (कळे), श्रीकांत लव्हटे (म्हाळुंगे), संग्राम खांबे (कळे), प्रकाश महाडिक (म्हाळुंगे), स्वप्निल पाटील (आमशी), संकेत पाटील (आमशी), संस्कार पाटील (म्हारुळ), आयुष पाटील (मल्हारपेठ).

यावेळी अशोकराव नारकर, विश्वेश कोरे, जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अभिनेता हार्दिक जोशी, प्रदीप पाटील (भुयेकर) उपस्थित होते. पंच म्हणून सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, राजाराम पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील, शहाजी पाटील, संजय पाटील, शरद इंजूळकर यांनी काम पाहिले. तर निवेदक एकनाथ पोहाळकर होते.

कार्यक्रमाचे संयोजन सुदर्शन पाटील, कैलाश कापसे, संदीप भोसले, प्रदीप मोरे, अजित मोरे, गणेश कांबळे, अमोल कापसे, वैभव पाटील, महादेव पाटील, रुपेश पाटील, अभिजित पाटील, ओंकार वाडकर, इंद्रजित पाटील, रामचंद्र पाटील, सागर पोवार, नितीश वैद्य यांनी केले.