|Saturday, October 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जगाला दृष्टी देणाऱया फर्डिनान्ड यांना गुगलची आदरांजली

जगाला दृष्टी देणाऱया फर्डिनान्ड यांना गुगलची आदरांजली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगप्रसिद्ध प्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयन यांच्या 181व्या जयंतीनिमित्त्ग ‘गुगल’ने आपल्या डूडलच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे.

फर्डिनान्ड मोनायर यांनी डायोप्टर या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणाच्या माध्यमातून लेन्सच्या क्षमतेची तपासणी करता येते. जगभरातील असंख्य नेत्ररूग्ण फर्डिनान्ड यांच्या कार्यामुळेच चांगली दृष्टी मिळवू शकले आहेत. तसेच नेत्रतज्ञाकडे लावण्यात आलेला मोनोयर चार्ट फर्डिनान्ड यांनीच विकसित केला आहे. मोनोयर यांनी विकसत केलेला डायोप्टर आणि मोनोयर चार्ट 1872पासून जगभरात वापरला जाऊ लागला, मोनोयर चार्टमध्ये वेगवेळय़ह आकारातील अक्षरांचा वापर केलेला असतो, ज्याच्या माध्यमातून दृष्टीची पडताळता येते.