|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » स्वाईन फ्लूने चार दिवसात दहा जणांचा बळी

स्वाईन फ्लूने चार दिवसात दहा जणांचा बळी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात स्वाईन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. गेल्या चार दिवसात तब्बल दहा जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. 2017मध्ये आतापर्यंत म्हणजेच सुरूवातीच्या साडेचार महिन्यात स्वाईन फ्लूने मृत्यू होणाऱयांची संख्या 181 वर पोहचली आहे.

एप्रिल महिन्यापर्यंत 933 स्वाईन फ्लूच्या रूग्णांची नोंद झाली आहे. या रूग्णांपैकी 563 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर 132 जणेंवर अजूनही पहलिकेच्या विविध रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे. सध्याचे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणुंच्या वाढीस पोषक असल्यामुळे या आजाराने डोके वर काढले आहे. मात्र स्वाईन फ्लू आजाराला घाबरून जाण्याची गरज नसून ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षण दिसल्यास घरगुती उपचार न करता त्वरित दवाखान्यात जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.