|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅलेपचा संघर्षपूर्ण विजय

हॅलेपचा संघर्षपूर्ण विजय 

वृत्तसंस्था / माद्रिद

विद्यमान विजेत्या व तिसऱया मानांकित सिमोना हॅलेपने निर्णायक सेटमध्ये 5-2 ची पिछाडी भरून काढत रॉबर्टा व्हिन्सीचा पराभव करून माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली.

कॅरोलिना प्लिस्कोव्हा, गार्बिन मुगुरुझा, जोहाना कोन्टा यासारख्या मानांकित खेळाडूनंतर या स्पर्धेबाहेर पडणारी हॅलेप ही आणखी एक मानांकित खेळाडू होणार असे वाटले होते. पण 11 पैकी 9 गेम्स गमविल्यावर दुसऱया सेटमध्ये 2-2 अशा बरोबरीनंतर हॅलेपने झुंजार प्रदर्शन करीत सेट जिंकून तिसरा सेट टायब्रेकपर्यंत लांबविला. ही लढत तिने 6-3, 2-6, 7-6 (7-2) असा जिंकून आगेकूच केली. तिची पुढील लढत 16 व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसुरशी होईल. स्टोसुरने कोलंबियाच्या मारियाना डय़ुक मेरिनोचा 6-3, 7-5 असा पराभव केला.