|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आनेवाडीत आनंदोत्सव

आनेवाडीत आनंदोत्सव 

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगित केल्याबद्दल ग्रामस्थांकडून पेढे वाटप

वार्ताहर/ कुडाळ-आनेवाडी

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. यानंतर ज्या गावात जाधव यांचे फार्महाऊस आहे त्या सातारा जिह्यातील जावली तालुक्यातील आनेवाडी गावात  ग्रामस्थांनी एकच जल्लोष करण्यात आला. पेढे वाटुन ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.

यावेळी सरपंच सौ. अश्विनी शिंदे, मुरलीधर शिंदे, दादा पाटील, दिलीप फरांदे, सुधीर फरांदे, शिवाजी फरांदे, विवेक पवार, आनंद पिसाळ, मंदार शिंदे, बाळासाहेब चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याची बातमी आनेवाडी गावात पसरताच सरपंच अश्विनी शिंदे यांनी ग्रामस्थाना एकत्रित करत आनंद व्यक्त केला. घरोघरी साखर वाटप करत गावातील प्रवेश कमानी जवळ मिठाई, पेढे वाटपही करण्यात आले.

पाकिस्तान सेनाने माजी नौदल अधिकारी कुलभुषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली बलुचिस्तानातून अटक करण्यात आली होती आणि पाकिस्तान न्यायालयाने त्यांना फाशी शिक्षा सुनावली होती. त्यांच्या फाशीच्या शिक्षेचा  देशभरातून निषेध करण्यात आला होता.

जावली तालुक्यातील आनेवाडी गावात कुलभूषण जाधव यांची जमीन व फार्म हाऊस आहे. गावात लोकांशी त्यांचे घरोब्याचे संबध होते म्हणून गावकरी हि जाधव हे आपल्याच गावचे नागरिक म्हणून त्यांना समजत होते. त्यांच्या अटकेनंतर आनेवाडी गावकऱयांनी पाकिस्तान सरकार व तेथील सेनेचा निषेध व्यक्त कार्य तीव्र निदर्शने केली होती व आपला रागही पाकिस्तान सरकारच्या विरोधातला व्यक्त केला होता. देशभरातून पाकिस्तानचा तीव्र विरोध झाल्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा करुन त्यांच्या या शिक्षेला स्थगिती मिळवली. भारत सरकारच्या दबावानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. यानंतर आनेवाडी गावात जल्लोष करण्यात आला. साखर, मिठाई, पेढे वाटुन ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. सरकारने स्थगिती तर मिळवली आहे आता त्यांना सोडवुन भारतात परत आणावे, अशी प्रतिक्रीयासुद्धा आनेवाडी ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

Related posts: