|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चीनच्या लिशुई शहराच्या महापौरांची मनपाला भेट

चीनच्या लिशुई शहराच्या महापौरांची मनपाला भेट 

प्रतिनिधी/ पणजी

 चीन देशातील लिशुई झेझिंग या शहराचे महापौर तसेच त्यांच्या अन्य सदस्यांनी काल पणजी महानगपालीकेमध्ये जाऊन महापौरे सुरेंद्र फुर्तादो तसेच इतर नगरसेवकांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर सुरेंद फुर्तादो यांनी लिशुईच्या महापौरांचे ंस्वागत केले तसेच पणजी शहराविषयी सविस्तर माहीती दिली. दोन्ही शहरांच्या महापौरांनी एकमेकांच्या आठवणीसाठी मानचिन्ह देण्यात आले.

 चीन देशाच्या नवनवीत तंत्रज्ञानाचा वापर पणजी शहरासाठी व्हावा तसेच पणजीतील रस्ते, सांतीनेज खाडी तसेच आधुनिक तंत्रज्ञानासाठी मदत करण्याची मागणी यावेळी महापौरांनी त्यांच्याकडे केली. तसेच पणजी आशियातील सर्वात जुनी महानगरपालीका असून या नगरपालीकेला ऐतिहासिक महत्व आहे हे  महापौरांनी त्यांना पटवून दिले. तसेच पणजीची संस्कृती ही चांगली असून या संस्कृतीची देवाण घेवाण करावी असेही यावेळी महापौरांनी त्यांना सांगितले.

 आपण पहिल्यांदाच भारताता आलो असून भारताची संस्कृती सुंदर आहे. तसेच  पणजी शहरातील नैसर्गिक सौदर्य खूप सुंदर आहे. असे गौरोवौदगार यावेळी लिशुईच्या महापौरांनी काढले. तसेच आपल्यासोबत आलेले सर्व चीनचे पाहुणे तुमच्यापाहुणचाराने आनंदीत झाले आहे. तुम्हीही आमच्या शहरात येऊन या शहराची पाहाणी करावी असे निमंत्रण यावेळी त्यांनी महापौरांना दिले. लिशुई हे शहर चीन देशातील खूप विकसीत शहर असून या ठिकाणी नविन तंत्रज्ञानाच्या आधारे शहराचा विकास करण्यात आला आहे. यासाठी तसेच या शहराचे नैसर्गिक सौंदर्यही खूप सुंदर आहे. पर्यटनक्षेत्रासाठी लिशूई शहर खूप प्रसिद्ध आहे. पणजी शहराची संस्कृतीचा  अभ्यास या शहरात आता केला जाणार आहे. तसेच लवकरच तुम्हाला या शहरात येण्याचा संदेश पाठविला जाणार आहे, असे यावेळी लिशुईच्या महापौरांनी सांगितले.

 चीन हे खूप विकसित देश असल्याने त्यांचा तंत्रज्ञानाचा उपयोग पणजी शहराला विकसित करण्यासाठी होणार आहे. यासाठी त्यांच्याकडे नविन तंत्रज्ञासाठी मदत होणार आहे. तशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे. भविष्यात त्यांनी आपल्याला या शहरात येण्याचे निमंत्रण दिले तर अवश्य त्या ठिकाणी भेट घेऊन त्या शहराची पाहणी करणार आहे, असे महापौर सुरेंद्र फुतार्दो यांनी सांगितले. यावेळी उपहापौर लता पारेख तसेच आयुक्त दिपक देसाई उपस्थित होते. तसेच यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Related posts: