13 रोजी राज्यभरातील पंचायतीमध्ये स्वच्छता अभियान
प्रतिनिधी / पणजी
येत्या शनिवारी दि. 13 मे रोजी राज्यभरातील पंचायतींमध्ये स्वच्छ गाव अभियान राबविले जाणार असून यासाठी सर्व सरपंच, पंच तसेच माजी सदस्यांनी भाग घेऊन आपला परिसर साफ ठेवावा असा संदेश काल पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये दिला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यभरातील सरपंच, पंच तसेच जिल्हा पंचायत सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाप्रमाणे स्वच्छ भारत योजना ही गावागावातून सुरु झाली पाहीजे यासाठी राज्यातील पंचायतींनी पुढाकर घेतला पाहीजे आता पंचायत निवडणूका जवळ आल्या आहेत. काही जण पुन्हा निवडून येणार आहे तर काही जण दुसऱयांना संधी देणार आहे. जरी आपण निवडून आलो नाही तरी आपले समाज काम आपण सुरुच ठेवले पाहीजे. पंचायत हे सरकारचे मुळे असून त्यांच्यापसून स्वच्छतेला सुरुवात केली पाहीजे.
सरपंचांनी आपल्या अधिकारांचा वापर करावा
पंचायतीचे सर्वात जास्त अधिकार हे सरपंचांना आहे कारण ते लोकांनी निवडून दिलेले नेते आहे. दुदैवाने राज्यातील काही पंचायतीमध्ये सचिव तलाठी यांच्याकडून पंचायत चालविले जाते. तसेच काही ठिकाणी पंचायतीचे मदतनीस सरपंचांना आदेश देत असतात हे चुकीचे आहे. सरपंचांनी आपल्या अधिकारांचा वापर केला पाहीजे. आपल्या गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे.
निधीसाठी प्रस्तावा पाठवावा
काही पंचायतींना निधी मिळत नसल्याने त्यांची कामे तसेच गोव्याचा विकास होत नाही. यासाठी पंचायतींनी पंचायत खाते तसेच पंचायत मंत्र्याकडे प्रस्ताव पाठवावा. तुमची कामे वेळेवर व्हावी यासाठी सरकार सर्व प्रयत्न करणार आहे. निवडणुकीनंतर काही पंचायतीमध्ये पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. तसेच पंचायतिच्या विकासामध्ये काय अडचणी येत आहे याचाही अभ्यास केला जाणार आहे, असे यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
पंचायतीमध्ये काही सरकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच सचिव, तलाठी यांच्याकडून लोकांची कामे अडविली जात असले तर नक्की त्यांच्यावर कारवाई केली जणार आहे. काही पंचायतीमध्ये अनेक वर्षे जे सचिव तलाठी म्हणून काम करत आहे .त्यांची बदली दुसऱया ंपंचायतीमध्ये केली जाणार आहे. जर पंचायतीच्या कामामध्ये सचिव्। तलाठी किंवा अन्य कुठलाही सरकारी सेवक अडचण आणत असेल तर सरपंचांनी पंचायत खात्याला निवेदन द्यावे, असे यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
ंपंचायतीच्या विकासाठी पंचायत खाते सर्वतोपर मदत करणार आहे. 13 रोजी पंचायत पातळीवर होणाऱया स्वच्छ अभियानमध्ये सर्व सरपंचांनी तसेच पंचानी भाग घेऊन याला सहकार्य करावे, असे यावेळी पंचायत संचालिका संध्या कामत यांनी सांगितले.
सरकारने निधी पुरवावाः चित्रा फडते
अपुऱया निधीमुळे पंचायत पातळीवरील कामे होत नाही. सरकारने सर्व पंचायतींना व्यवस्थित निधी पुरवावा. तसेच सर्व पंचायतीची जी कामे अडवून राहीली आहे ती पूर्ण &करावी. स्वच्छता अभियानात सर्व सदस्यांनी सहभाग घ्यावा, असे यावेळी जिल्हा परिषदेच्या दक्षिण गोवाच्या उपाध्यक्षा चित्रा फडते यांनी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदच्या उत्तर गोव्याच्या अध्यक्षा अंकिता नावेलकर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दशरथ रेडकर, उपसंचालक सुधिर केरकर, अजय गावडे उपस्थित होत.
बॉक्स करावा
लवकरच होणाऱया ंपंचायत निवडणूकीमध्ये सरकारने सर्वांना समान लेखले आहे. सर्व जातीधार्माच्या लोकांना या निवडणूकीमध्ये आपले प्रतिनिधित्व दाखविता येणार आहे. यासाठी सरकारने अनुसुचित जातीचे 15 सीट राखीव ठेवण्यात आले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे. तसेच इतर जाती जमातीच्या लोकांना या निवडणूकीत आपले प्रतिनिधित्व करता येणार आहे.s ही निवडणूक सर्वांना एकत्र घेऊन जाणारी आहे, असे यावेळी पंचायत मंत्र्यांनी नमुद केले.