|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल’ विषयी विचारांती निर्णय

‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल’ विषयी विचारांती निर्णय 

प्रतिनिधी/ पणजी

“संगीत हा गोव्याच्या जीवन व संस्कृतीचाच भाग आहे. त्यामुळे गोव्यात होणाऱया कार्यक्रमांमधून संगीत वजा करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल’ म्हणजेच ‘इडीएम’सारख्या कार्यक्रमांबद्दल विचार सध्या सुरू आहे. असे कार्यक्रम यापुढे आयोजित करायचे की नाही याविषयी विचारांती निर्णय घेण्यात येईल’’ असे प्रतिपादन पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी येथील कांपाल मैदानावर आयोजित केलेल्या अन्न व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

गोवा अन्न व सांस्कृतिक महोत्सव 2017 या महोत्सवाचे काल पणजीतील कांपाल मैदानावर दिमाखदार उद्घाटन झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर, गोवा पर्यटन महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांच्याहस्ते महोत्सवाचे रिमोटच्या नियंत्रणाच्या आधारे प्रचंड मोठय़ा डिजीटल क्रीनवर दिमाखदार सोहळ्यामध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यटन महामंडळाचे इतर अधिकारी तसेच वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी व सरकारी कर्मचारी उपस्थित होते. रात्री 7.45 च्या दरम्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मनोहर आजगावकर यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी उद्घाटन समारंभासाठी उभारण्यात आलेल्या शामियान्यावर येऊन उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांशी फारसे काही न बोलता अथवा चर्चा न करता सरळ परतीची वाट धरणे पसंत केले.

 

संगीत हवेच, पण अंदाधुदी नको

संगीत हा गोव्याच्या संस्कृतीचा कणा असल्यामुळे संगीत हे हवेच, पण अंदाधुदी नको असे उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर म्हणाले. त्यामुळे यापुढे ‘इडीएम’सारखे महोत्सव आयोजित करावे की नाहीत याविषयी विचार करण्यात आल्यानंतर तो बंद करावा की सुरू ठेवावा याविषयी निर्णय घेण्यात येईल. याविषयी अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: