|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन अडकले लाल फितीत

गोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन अडकले लाल फितीत 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा राज्य सहकारी बँकेचे प्रस्तावित विभाजन रखडले असून राज्य सरकारने ना हरकत दाखला दिलेला नाही. तसेच दमण दीव बँकेसाठी (विभाजन) भाग-भांडवल देण्यासाठी सरकारची संमती न मिळाल्याने एकंदरित विभाजनाची प्रक्रिया लाल फितीत अडकून पडली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) राज्य सहकारी बँकेचे विभाजन करण्याची सूचना केली होती. त्या सूचनेला अनेक वर्षे उलटली. परंतु सरकारकडून दाखले, भाग-भांडवलासाठी संमती मिळत नसल्याने हे विभाजन सरकारच्या फाईलमध्ये अडकून पडले आहे. 2012 मध्ये पर्रीकर सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर 2014 मध्ये पार्सेकर सरकार झाले. परंतु दोन्ही सरकारनी या बँकेच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचाच परिणाम म्हणून ही प्रक्रिया धूळखात पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोवा राज्यात 61 शाखा

गोवा राज्य आणि दमण-दीव येथील मिळून बँकेच्या एकूण 70 शाखा आहेत. त्यात दमण-दीवच्या 9 शाखांचा समावेश आहे. म्हणजे गोवा राज्यात 61 शाखा आहेत. गोवा राज्य सहकारी बँकेचे विभाजन होऊन दमण-दीव सहकारी बँक अशी वेगळी बँक स्थापन होणार आहे. तथापि त्यासाठी दमण-दीवचे भाग-भांडवल त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची गरज आहे.

दमण-दीव या ठिकाणी शाखा असल्याने बँकेला ‘बहुराज्य’ (मल्टीस्टेट) दर्जा आहे. परंतु दमण-दीवची बँक वेगळी झाल्यानंतर हा दर्जा जाणार आहे. परिणामी राज्य सहकारी बँक त्यानंतर ‘बहुराज्य’ राहणार नाही, अशी परिस्थिती आहे.

ऑगस्टमध्ये संचालक मंडळाची मुदत संपणार

पुढील आठवडय़ात म्हणजे साधारणपणे 18 मे रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यात हा विभाजनाचा विषय चर्चेसाठी येणार आहे. त्याशिवाय ऑगस्ट 2017 मध्ये संचालक मंडळाची 5 वर्षाची मुदत संपुष्टात येणार आहे. नवीन मंडळासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होणर की तशीच राहणार याबाबत कोणालाच काही माहिती नसल्याचे दिसून आले.

Related posts: