|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘माणुसकीच्या भिंती’ ला लागली कोणाची नजर

‘माणुसकीच्या भिंती’ ला लागली कोणाची नजर 

प्रतिनिधी /सातारा :

गरजु लोकांना मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जेव्हा माणुसकीच्या नावाने भिंतीची स्थापना करण्यात आली त्यानंतर गावोगावी माणुसकीच्या भिंत जन्माला आली. तसेच नवजात शिशु प्रमाणे साताऱयातही काही सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी मिळून ‘माणुसकीच्या भिंती’ ला जन्माला घातले. परंतु दोन महिने केवळ शो ऑफ करण्यासाठीच सामाजिक कार्यकर्ते याठिकाणी येवून फोटो पुरते लोकांना मदत केली आणि नवजात शिशुला मारुन टाकावे तसे त्या भिंतीचा नामोनिशान मिटून टाकला आहे. खरोखरच माणुसकीच्या भिंतीला कोणाचीतरी नजर लागल्याचे चित्र दिसुन येत आहे.

मनुष्य आणि प्राण्यामध्ये फरक काय असतो तर मुनष्यामध्ये असतो तो माणुसकीचा भाव. आणि त्यातूनच एकमेकांना मदत करण्याचा भावनेने माणुसकीच्या भिंतीला सुरुवात झाली. मग साताऱयातील पोस्ट ऑफिस समोर आणि जिल्हा परिषद मैदानासमोर काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येवून लोकांकडून आपल्या जे नको आहे ते द्या आणि जे हवे आहे ते घेवून जा असे सांगुन सर्व प्रकारच्या वस्तू जमा केल्या आणि एवढया दिवसांत केवळ 3 ते 4 वेळाच माणुसकीची भिंत चालवून वॉटसऍप, फेसबुक, टयुटर, इनस्टाग्रामवर आपले फोटो फिरुन आल्यावर लोकांनी त्या भिंतीकडेच दुर्लक्ष केले आहे. ज्या उद्देशाने या भिंतीची स्थापना केली तो उद्देश बाजूलाच राहून प्रत्येकजण एकमेकांना मदत करताना फोटोकाढून मी किती दिलदार याचा खुलासा फेसबुक आणि वॉटसऍपवर करताना दिसत आहे. खरोखरच माणुसकी च्या भिंतीच्या आड माणुसकीच झाकुन गेली आहे का? असा प्रश्न सामान्य जनतेकडून केला जात आहे. तर सध्या माणुसकीची भिंती पुर्णपणे नाहीशी करुन त्याचा नामोनिसान काढून टाकला आहे. माणुसकीची भिंती ही काय केवळ शो ऑफ साठीच होती का असाही प्रश्न लोकांकडून होत आहे. आणि जे स्वतःच्या प्रसिध्दीसाठी या भिंतीसोबत मदत करताना आपले फोटो काढले आहेत ते मात्र आजतागत कोणालाही दिसले नाही. बुरी नजर वाले तेरा मुह काला असे म्हटले जाते परंतु लोकांनी माणुसकीची भिंती काळी करुन टाकली आहे. आणि सर्व नाहिसा करुन आपआपल्या जीवनात परतले आहेत.

 

Related posts: