|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात रावसाहेब दानवेंचा शिवसेनेतर्फे निषेध

कराडात रावसाहेब दानवेंचा शिवसेनेतर्फे निषेध 

प्रतिनिधी /कराड :
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कराड येथे शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
जालना येथील कार्यकर्ता मेळाव्यात राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडगाणं चालूच आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या या वक्तव्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कराड येथे गुरूवारी दत्त चौकात शिवसेनेच्या वतीने दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख रामभाव रैनाक, तालुकाप्रमुख विनायक भोसले, शहरप्रमुख शशिराज करपे, किरण नलवडे, मयुर देशपांडे, महेश पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
हर्षद कदम म्हणाले, दानवेंचं वक्तव्य म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. बेताल वक्तव्य करून त्यांनी शेतकऱयांची चेष्टा चालवली आहे. एकीकडे शेतकरी चहूबाजूंनी संकटात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याची गरज असताना जबाबदार व्यक्तींकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. शेतकऱयांविरोधात वक्तव्य करणाऱयांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल. बळीराजाची चालवलेली मस्करी कदापी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत रावसाहेब दानवेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली

Related posts: