|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पावसाळयापूर्वी रस्ते पूर्ण होणार ?

पावसाळयापूर्वी रस्ते पूर्ण होणार ? 

पंढरपूर / प्रतिनिधी :

पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसापासून रस्तांची कामे सुरू आहेत. मात्र ही सर्व कामे अत्यंत संथगतीने सुरू असलेली दिसून येत आहेत. याबबात जिल्हाधिकारी तसेच पालिकेतील सत्ताधारी गटांचे नेते यांनी आषाढीपूर्वी कामे पूर्ण करण्यांच्या सुचन्या केल्या आहेत. मात्र आषाढीच्या तोंडावर कामास गती देण्यापेक्षा आताच कामास गती दिली. तर निश्चितय येत्य काही दिवसात कामे पूर्ण होउ शकतात.

         पंढरपूर येथे साधारणपणे 50 कोटीहून अधिक रूपये खर्च करून आठ रस्तांची कामे आहेत. यापैकी चार रस्तंची कामे ही गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. मात्र गेले पंधरा दिवसातील रस्तांची कामे पाहीली तर अत्यंत संथगतीने तसेच रेंगाळलेंल्या अवस्थेत असलेली दिसून येत आहेत. त्यामुळे साहजिकच सदरची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण यामुळे मोठया प्रमाणावर या कामांचा नागरिकांना त्रास होताना दिसत आहे.

सध्या पंढरपूर शहरांमधे सध्या शहरातील न्यायाधीश यांच्या घरांसमोरील रस्ता , तसेच कुंभार गल्ली ते भीमा नदी , पदमावती बाग ते माळी वस्ती , जनावरांच्या दवाखान्यांच्या शेजारील रस्ता अशा चार रस्त्यांचे सध्या खोलीकरण करून तिथे पाईपलाईन करण्यात येत आहेत. सदरचे रस्ते हे रस्ता रूंदीकरण करून सुरू आहेत. हे कॉक्रिटीकरण रस्ता करताना दोन्ही बाजूने पावसांचे पाणी , व सांडपाण्याचा निचरा कसा होईल.  याबाबतचेही नियोजन देखिल या रस्तांच्या कामांमधे सुरूवातीपासून करण्यात आले आहे.

Related posts: