|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खासगी शिक्षकाचे अपहरण आणि सुटका

खासगी शिक्षकाचे अपहरण आणि सुटका 

 सोलापूर / प्रतिनिधी :

बार्शी येथील रवि क्लासेसचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते मधुकर डोईफोडे यांच्या अपहरण नाटय़ाने संपूर्ण जिल्हय़ात खळबळ उडाली. अपहरणाचे अद्याप कारण पुढे आले नसले तरी प्राथमिक तपासात पैशाचे कारण पुढे आले आहे.

मधुकर डोईफोडे हे दररोज पहाटे मॉर्निगवॉकसाठी बाहेर पडतात. नियमाप्रमाणे आजही ते बाहेर मॉर्निगवॉकसाठी बाहेर पडले होते. फिरून घराकडे परत येत असताना बार्शीतील हॉटेल गौरी समोर आले असता पाठीमागून विनानंबरच्या आलेल्या स्कॉर्पीओ गाडीतल चौघांनी अचानकपणे त्यांना धमकावणी देत जबरदस्तीने त्यांना गाडीत कोंडले. आणि गाडी सुसाट वेगाने कुर्डूवाडीच्या दिशेने निघून गेली. त्यांच्या पाठीमागे पुढे असलेल्या नागरीकांच्या लक्षात हा प्रकार येताच डोईफोडे यांच्या अपहरणाचा प्रकराची शहरभर चर्चा सुरू झाली.

कुर्डुवाडीच्या दिशेने गाडी गेल्याने काही नागरीकांनी खांडवी गावातील नागरीकांना भ्रमणध्वीनीवरून माहिती दिली. त्यामुळे या गावातील काहीतरूणांनी गावातील मार्गावर बसण्याचे बाके अडवून रस्ता बंद केला. पण, अपहरणकर्त्यानी अडवी लावलेल्या बाकातूनही गाडी बाहेर काढत तेथून परांडाच्या दिशेने आगेकुच केली.

अपहरणकर्त्यानी डोईफोडे यांच्या डोळय़ावर पट्टी बांधली होती. शिवाय घराकडे फोन करून सांगून पैशाची मागणी करीत असल्याचे सांगण्यात आले. पण, आपण मोबाईल आणला नाही. तुमच्याच मोबाईवरून फोन करा असे डोईफोडे यांनी सांगितले. पण, चाणाक्ष असलेल्या अपहरणकर्त्यानी त्यांच्या मोबाईवरून फोन केला नाही. पण, अपहरणकर्ते मोबाईवर दुसऱयाशी वारंवार संपर्क करीत होते. आणि त्याच्या सांगण्यावरूनच हे अपहरणकर्ते अंमलबजावणी करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या अपहरणाचा मुख्यसुत्राधार वेगळाच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.