|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » विविधा » जम्मूमध्ये साकारणार जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

जम्मूमध्ये साकारणार जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 

ऑनलाईन टीम / जम्मू- काश्मीर :

भारतीय रेल्वे जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिह्यात चिनाबा नदीवर होत असलेला रेल्वे फूल भारतीय अभियंत्रीकीचे आश्चर्य म्हणता येर्अल. हा जगातील सगळय़ात उंच रेल्वे पूल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल. या पुलाचे काम कोकण रेल्वे निगम लिमिटेडकडे आहे.

कोकण रेल्वे निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले की, चिनाबवरील पुलावर एक बंजी जंपिंग प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या बक्कल आणि कौडी गावांसाठी रेल्वेस्थानक असेल. या पुलाच्या जवळपासच्या हिरव्यागार वातावरणात जवळपास चार किलोमिटर दूर एका जागेची निवड केली गेली असून, तेथे आधुनिक सुविधांचा रिर्सार्ट बनवला जाईल. रात्री रोषणागईत पुलाच्या खाली नौकाविहाराचा आनंद रोमहर्षक असेल.