|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » लष्कराकडून ‘एल ऍण्ड टी’ला 4,500 कोटीचे कंत्राट

लष्कराकडून ‘एल ऍण्ड टी’ला 4,500 कोटीचे कंत्राट 

100 हॉवित्झर्सचा पुरवठा करणार  

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

इंजीनियरिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी लार्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी)ला भारतीय लष्कराकडून 100 हॉवित्झर्स पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे. हा कंत्राटाची रक्कम साधारण 4,500 कोटी रुपयांची आहे. भारतीय लष्कराकडून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा रकमेचे कंत्राट भारतीय खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे.

एल ऍण्ड टी कंपनीकडून 155 मिमी/52 कॅलिबर क्षमता असणाऱया के9 वजरा-टी प्रकारातील स्वयंचलित बंदुकांच्या पहिल्या बॅचचा पुरवठा या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल. उर्वरित सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी 42 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 2011 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लिलावात एल ऍण्ड टीने हनव्हा टेक विन या दक्षिण कोरियन तंत्रज्ञान कंपनीबरोबर बोली लावली होती. भारतीय लष्कराच्या खास मागणीनुसार हा पुरवठा करण्यात येणार आहे.

के9 थंडर या बंदुकांचा दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये वापर होत असून आतापर्यंत 1 हजार युनिट्सचा पुरवठा करण्यात आला आहे. के9 थंडरची के9 वजरा-टी ही आधुनिक श्रेणी आहे. भारतीय लष्करासाठी आवश्यक असणाऱया अत्याधुनिक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी, डिझाईन आणि विकसित करण्यासाठी कंपनी प्रयत्न करेल. कंपनीला मिळालेल्या कंत्राटामुळे खासगी संरक्षण क्षेत्रात कंपनीचे स्थान वधारले आहे. कंपनीकडून या बंदुकांचा पुरवठा करण्यात आल्यानंतर त्यांची देखभाल कंपनीकडून करण्यात येईल असे एल ऍण्ड टीच्या संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जयंत पाटील यांनी म्हटले.

भारतीय लष्करासाठी स्वयंचलित हॉवित्झर्सचा पुरवठा करण्यासाठी एल ऍण्ड टी आणि हनव्हा टेक विन या कंपन्यात गेल्या महिन्यात करार झाला आहे.

 

Related posts: