|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » अजहर अलीचे शतक, पाक सर्वबाद 376

अजहर अलीचे शतक, पाक सर्वबाद 376 

मिसबाह, सर्फराजचीही अर्धशतके, विंडीजची   पहिल्या डावात सावध सुरुवात

वृत्तसंस्था/ रॉस्यू

येथे सुरु असलेल्या विंडीजविरुद्ध तिसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी पाक ने पहिल्या डावात 146.3 षटकांत सर्वबाद 376 धावा केल्या. विंडीजने पहिल्या डावात खेळताना दुसऱया दिवसअखेर बिनबाद 14 धावा जमवल्या होत्या. कार्लोस बेथवेट (5) व केरॉन पॉवेल (9) धावांवर खेळत होते. विंडीज अजून 362 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 10 गडी खेळायचे बाकी आहेत.

तत्पूर्वी, पाकिस्तानने 2 बाद 169 धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. डावातील आठव्याच षटकांत आपली शेवटची कसोटी खेळत असलेल्या अनुभवी युनूसला होल्डरने बाद करत पाकला तिसरा धक्का दिला. युनूसने 18 धावा केल्या. दरम्यान, अजहरने शानदार शतक साजरे करताना 334 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 127 धावांचे योगदान दिले. शतक पूणू झाल्यानंतर रोल्टन चेसने अजहरचा त्रिफळा उडवला.

अजहर अली बाद झाल्यानंतर कर्णधार मिसबाह उल हक (59) व सर्फराज अहमद (51) यांनी शानदार अर्धशतके झळकावताना संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. असद शफीकने 14 धावांचे योगदान दिले. शफीक बाद झाल्यानंतर मोहम्मद अमीर (7), यासीर शाह (0.), मोहम्मद अब्बास (0.) झटपट बाद झाल्याने पाकचा पहिला डाव 146.3 षटकांत 376 धावांवर संपुष्टात आला. विंडीजतर्फे रोल्टन चेसने 4 तर जेसॉन होल्डरने 3 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया विंडीजने पहिल्या डावात सावध सुरुवात केली. दुसऱया दिवशीचा खेळ थांबला तेव्हा विंडीजने पहिल्या डावात 14 षटकांत बिनबाद 11 धावा केल्या होत्या. कार्लोस ब्रेथवेट 5 तर केरॉन पॉवेल 9 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव 146.3 षटकांत सर्वबाद 376 (अजहर अली 127, शान मसूद 9, बाबर आझम 55, युनूस खान 18, मिसबाह उल हक 59, सर्फराज अहमद 51, असद शफीक 17, मोहम्मद अमीर 7, हसन अली नाबाद 8, रोल्टन चेस 4/103, जेसॉन होल्डर 3/71, देवेंद्र बिशू 2/61). वेस्ट इंडिज पहिला डाव 14 षटकांत बिनबाद 11 (कार्लोस ब्रेथवेट खेळत आहे 5, केरॉन पॉवेल खेळत आहे 9, मोहम्मद अमीर 0/5, यासीर शाह 0/4).

Related posts: