|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीकडून दानवे यांच्या पूतळ्याचे दहन

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीकडून दानवे यांच्या पूतळ्याचे दहन 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरूवार 11 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रावसाहेब दानवेंच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. येथील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले.

खासदार रावसाहेब दानवे यांनी कितीही तूर खरेदी केली तरी अजूनही शेतकऱयांच्या रडगाणे सुरू आहे. हे साले रडतच असतात, अशी वादग्रस्त वक्तव्य केलं होत. या व्यक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला. येथील क्रांती चौकात सावकर मादनाईक व सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून शंख ध्वनी करण्यात आला. तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सावकर मादनाईक म्हणाले, रावसाहेब दानवेंचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. ज्या शेतकऱयांच्या जीवावर हे निवडून आले आहेत. त्याच शेतकऱयांना असली भाषा हे वापरत असतील तर हे चुकीचे आहे. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करतो.

तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, सुभाष शेट्टी, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, शैलेश चौगुले, सागर चिपरगे, रामचंद्र फुलारे, सुनिल खवाटे, संदीप बेडगे, अमित बेडगे, अमित सांगले, कलगोंडा पाटील, संदीप पुजारी, दिग्वीजय सूरवंशी, रमेश भोजकर, आण्णासो पाणदारे आदी उपस्थित होते.