|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नवीन वाहन न दिल्यास रिक्षातून येणार

नवीन वाहन न दिल्यास रिक्षातून येणार 

जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हा पंचायतीच्या मासिक विकास आढावा बैठकीत अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या नवीन वाहनाचा मुद्दा गाजला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन वाहन न दिल्यास मी रिक्षातून जि. पं. कार्यालयास येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अध्यक्षांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे जि.पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी अधिकारीवर्गाला धारेवर धरले. तसेच जूनमध्ये नवीन वाहनाची व्यवस्था करण्याची सूचना अधिकाऱयांना केली.

जि. पं. सभागृहात शुक्रवारी ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे होत्या. अध्यक्षा म्हणून जास्त काम करण्याची आपली इच्छा आहे. मात्र अधिकारीवर्गाचे सहकार्य मिळत नाही. विकासकामांबाबत आपणास माहिती देण्यात येत नाही. वर्षभरात अधिकारीवर्गाने केलेल्या असहकार्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. बेळगाव जि.पं.ला आदर्श जि. पं. करण्याचे आपले स्वप्न आहे. यासाठी अधिकारीवर्गाने यापुढे सहकार्य करावे, असे ऐहोळे यांनी सांगितले.

राज्य सरकारने बेंगळूर येथे ग्राम विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, आपले वाहन नादुरुस्त असल्याने त्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहू शकले नाही. वर्षभरापासून नवीन वाहनासाठी आपण मागणी करीत आहोत. परंतु नेहमीच टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन वाहनाची व्यवस्था न झाल्यास आपण रिक्षातून जि. पं. कार्यालयास येणार असल्याचे आशा ऐहोळे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पीडीओंना समज द्यावी

बैठकीत नरेगा अंतर्गत घेण्यात आलेल्या कामकाजाची माहिती अधिकारी होसमनी यांनी दिली. यावर शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष मोहन मोरे यांनी आक्षेप घेतला. नरेगा अंतर्गत अनेक पंचायतींमध्ये कामे देण्यात येत नाहीत. विशेषत: महिलांना कामापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच संबंधित पीडीओंना समज द्यावी, अशी मागणी केली. यावर होसमनी यांनी काम न देणाऱया पंचायतींची नावे देण्यास सांगितले.

 शेतकऱयांना सकाळच्या सत्रात थ्रीफेज वीज द्या

हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी माहिती देताना शहरात वीज समस्या नसल्याचे सांगितले. ग्रामीण भागात दररोज 6 ते 7 तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन मोरे यांनी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीज पुरवठा सुरू असल्याने शेतकऱयांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. यामुळे सकाळच्या सत्रात थ्रीफेज वीज देण्याची मागणी केली.

 कर्ले-किणये रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर रस्ता कामास सुरुवात करावी, बेळगुंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्ता तसेच बिजगर्णी-कुदेमनी या रस्त्याच्याही कामास मंजुरी मिळाली असून सदरच्या कामास लवकर सुरुवात करावी, बोकनूर रस्त्याच्या कामासही मंजुरी मिळाली आहे. कर्ले-किणये रस्त्याच्या कामासही लवकरच सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी मोरे यांनी यावेळी केली.

बैठकीत माहिती देताना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी पुरुषोत्तम यांनी सध्या नवीन रेशनकार्डासाठी 1 लाख 7 हजार अर्ज आले असल्याचे सांगितले. या सर्व अर्जांची तपासणी करून पात्र नागरिकांना बीपीएल तसेच एपीएल कार्डांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जि. पं. योजना अधिकारी ए. डी. दोडमनी यांनी जिल्हय़ात राबविण्यात आलेल्या विविध वसती योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या घरांची माहिती दिली. बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत यावषी कोणतीही नवीन कामे हाती घेण्यात आली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. अन्य खात्यांतील अधिकाऱयांनीही खात्याशी संबंधित माहिती दिली. व्यासपीठावर जि.पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. आणि उपाध्यक्ष अरुण कटांबळे उपस्थित होते.

चौकट करणे   सर्वत्र कन्नड सक्ती करण्याचा घाट

राज्य सरकारने सर्वच सरकारी कार्यालयात कन्नड भाषेत व्यवहार करण्यात यावा, अशी सूचना केली आहे. याअंतर्गत सर्व खात्यातील अधिकाऱयांनी दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत कन्नडच्या अंमलबजावणीबाबत आपला अहवाल कन्नड व सांस्कृतिक खात्यास द्यावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. यावरून सर्वत्र कन्नड सक्ती करण्याचा

Related posts: