|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » कूलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य

कूलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य 

ऑनलाईन टीम /मुंबई :

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय न्यायालयाने दिलेले आदेश अमान्य असल्याचे पाकिस्तानचे ऍटॉर्नी जनरल यांनी सांगितले आहे.

आंतराराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश अमान्य असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतराराष्ट्रीय न्यायालय 15 मेपासून सुनावणीला सुरूवात करणार आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा व्हिएना करारच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले आहे. कुलभषण जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. संयुक्त राष्ट्राकडून अधिकृतपणे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

 

Related posts: