|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर 19 लाखांचे सोने जप्त 

प्रतिनिधी/ वास्को

कस्टम विभागाच्या दाबोळी विमानतळावरील हवाई तज्ञ पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 19 लाखांचे तस्करीचे सोने पकडण्यात आले. कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी हवाई प्रवाशाकडून सदर सोने जप्त केलेले आहे. मात्र, सदर प्रवाशाचे नाव उघड केलेले नाही. काल रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

  अधिक माहितीनुसार रविवारी सकाळी दाबोळी विमानतळावर गस्तीवर असलेल्या कस्टमच्या हवाई तज्ञ पथकाच्या अधिकाऱयांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका प्रवाशाबाबत संशय आल्याने त्याच्या मागावर राहिले. त्यानंतर त्या प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडे सोने सापडले. हे सोने सहा कांडय़ांच्या स्वरूपात होते. सहा कांडय़ांचे एकूण वजन 698 ग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 18 लाख 63 हजार रूपये ऐवढी आहे. हे सोने अवैध मार्गाने भारतात आणण्यात आले होते.

  सकाळी शारजाहून गोव्यात आलेल्या एअर अरेबियाच्या विमानातून हा प्रवासी उतरला होता. कस्टम विभागाने त्याचे नाव उघड केलेले नाही. मात्र हा प्रवासी शरणपूर, उत्तर प्रदेशमधील आहे. सोने त्याने आणलेल्या सामानातील एलईडी टॉर्चमध्ये लपवले होते. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

  दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या पथकाने एप्रिल महिन्यापासून आतापर्यत तस्करीचे सोने पकडण्याच्या आठ कारवाया केलेल्या असून हवाई प्रवाशांकडून 82 लाख रूपये किमतीचे 3 किलो ग्रॅम सोने जप्त केले आहे. तस्करीचे सोने जप्त करण्याबरोबरच कस्टमने 42 लाख 26 हजार रूपये किमतीचे विदेशी व देशी चलनही जप्त केलेले आहे. गोवा कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त जैन व आयुक्त ए. के. अनपाकाझन यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Related posts: