|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रा. विजय कुंभार शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रा. विजय कुंभार शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित 

वार्ताहर / निपाणी

अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे यमगर्णीचे सुपुत्र प्रा. विजय कुंभार यांना नुकतेच महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे यमगर्णीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

हातकणंगले तालुक्यात कार्यरत असणाऱया क्रांतीरत्न सोशल फौंडेशनने प्रा. विजय कुंभार यांच्या कार्याचा आढावा घेत या पुरस्कारासाठी निवड केली.  पुरस्काराचे वितरण इचलकरंजी येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी रोटरी क्लबचे अध्यक्ष महादेव खारगे, जि. पं. सदस्या परवीन पटेल, क्रांतीरत्नचे अध्यक्ष उत्तम हुजरे, नगराध्यक्षा अलका स्वामी, पोलीस निरीक्षक सतीश पवार, प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.