|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » यशश्री मुंडे यांनी मिळवली एलएलएमची पदवी

यशश्री मुंडे यांनी मिळवली एलएलएमची पदवी 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या यशश्री मुंडे यांचा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. यशश्री यांची कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे तसेच ज्येष्ठ भगिनी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आवर्जुन उपस्थित होत्या. कायद्याच्या अभ्यासासाठी कॉर्नेल विद्यापीठ हे जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट या गौरवासोबत यशश्री यांना 250 अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यात आली. मात्र ती रक्कम यशश्री यांनी तेथील अनाथाश्रमाला दान केली. यशश्री यांच्या मोठय़ा बहीण आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या जगातील केवळ 11 टक्के विद्यार्थ्यांनाच या विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यामध्ये यशश्री मुंडे यांचा समावेश होता. शिवाय पदवीदान समारंभामध्येही त्यांचा प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट म्हणून गौरव करण्यात आला.

 

Related posts: