|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » लालू प्रसाद यादवांवर आयकर विभागाची छापेमारी

लालू प्रसाद यादवांवर आयकर विभागाची छापेमारी 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली  :

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणेंवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभाग आज सकाळी 8.30च्या पासून कारवाई करत आहे.

एक हजार कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने दिल्ली आणि गुडगावमधील 22 ठिकाणी छापे टाकले आहेत.लालू प्रसाद यादव यांच्यासह खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरावर छापा टाकण्यात आला. लालू प्रसादर यादव यांच्यावर 1000 कोटी रूपयांची बेनामी जमिनीच्य व्यवहाराचा आरोप आहे. बिहारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर हा आरोप केला होता. लालू यांच्या कुटुंबियाने दिल्लीत 115 कोटी रूपयांची अवैध संपत्ती आपल्या नावावर केल्या दाला सुशीलकुमार मोदी यांनी केला होता.