|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » देशातील आयटी कंपन्यांकडून रोजगार कपात नाही : सरकार

देशातील आयटी कंपन्यांकडून रोजगार कपात नाही : सरकार 

केवळ कंत्राटी कामगारांचे मूल्यमापन सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

आयटी क्षेत्रातील प्रचंड प्रमाणावरील रोजगार कपातीनंतर या क्षेत्रात रोजगाराबाबत साशंकता निर्माण झाल्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार कपात करण्यात येत नाही. प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सध्या आयटी क्षेत्राचा विकास 8 ते 9 टक्क्यांनी होत आहे. त्यामुळे रोजगार कपातीची समस्या उद्भवली नाही असे कंपन्यांनी सांगितल्याचे आयटी सचिव अरुण सुंदराजन यांनी म्हटले.

कामगार कपात करण्यात आली आहे, ते कंत्राट प्रणालीवर काम करत होते. त्यांन नियमित मूल्यमापन  देण्यात आले नाही. रोजगार कपात केल्याचे काही कंपन्यांचे नाव समोर आले आहे. सध्या सुरू असणाऱया वर्षात कोणत्याही प्रकारची कपात करण्याचा कंपन्यांचा विचार नाही, असे सुंदरराजन यांनी ब्रॉडबँड इंडिया फोरममध्ये म्हटले.

वार्षिक मूल्यमापनच्या वेळी काही कर्मचाऱयांचे कंत्राट नव्याने करण्यात आले नाही. मात्र रोजगार कपात करण्यात आल्याचे म्हणण्यात येणे हे पूर्णतः चूकीचे आहे. सरकारने कंपन्यांच्या रोजगार कपातप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. आयटी क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात 5 लाख लोकांना रोजगार देण्यात आला आहे आणि भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले.

Related posts: