|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » डिसेंबर 2017 पर्यंत 7.9 टक्के विकास दर

डिसेंबर 2017 पर्यंत 7.9 टक्के विकास दर 

मार्गन स्टॅनलीचे भाकित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय अर्थव्यवस्था उत्पादक विकास चरणात प्रवेश करत आहे. डिसेंबरपर्यंत वास्तविक विकास दर 7.9 टक्क्य ांपर्यंत पोहोचू शकतो असे अहवालात म्हणण्यात आले. विदेशातून भारतीय उत्पादनांसाठी वाढती मागणी, कंपनीचे समाधानकारक खाते आणि खासगी क्षेत्राती निधी असल्याने देशाच्या जीडीपीमध्ये सुधारणा दिसत आहे, असे मॉर्गन स्टॅनलीकडून म्हणण्यात आले.

उत्पादक विकास चरण म्हणजे वाढीमध्ये सुधारणा अशावेळी होते, जेव्हा दीर्घकालीन लक्ष्य ठेवत सतत विकासाचे चक्र सुरू होण्याची अनुकूल परिस्थिती असते. मार्गन स्टॅनलीच्या या अहवालानुसार विकासाचा दर उंच असून शकतो आणि आगामी तीन महिन्यात 1 टक्क्यांनी दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या अंदाजानुसार, देशाच्या विकासात आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीपासून वेगाने वाढ होईल. साधारण 1 टक्क्यांच्या वाढीने डिसेंबरर्पंत देशाचा विकास दर 7.9 टक्क्यांवर पोहोचले. सध्या हा विकास दर 7 टक्के आहे.

नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. आगामी काळात देशाचा विकास वेगाने होईल. दुसऱया तिमाहीनंतर देशाचा वेग समाधानकारक असेल. यासाठी तीन प्रमुख कारणे असतील. विदेशातून मागणी वाढणे, कंपन्यांच्या खात्यात सुधारणा आणि खासगी क्षेत्रात 2018 पर्यंत चांगली गुंतवणूक ही कारणे आहे असे म्हणण्यात आले.

Related posts: