|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » कुलभूषण जाधवप्रकरण ; आंतरराष्ट्रीय न्यायालय सुनावणार उद्या निकाल

कुलभूषण जाधवप्रकरण ; आंतरराष्ट्रीय न्यायालय सुनावणार उद्या निकाल 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

हेरगिरीच्या आरोपावरुन भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील युक्तिवाद पूर्ण झाला असून, यावरील निकाल उद्या सुनावण्यात येणार आहे.

पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताने या निर्णयाला आव्हान देत आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तानला अमान्य होता. त्यानंतर आज भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची बाजू ऐकून घेण्यात आली असून, युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दरम्यान, याबाबतचा निर्णय उद्या दुपारी साडेतीनच्या सुमारास होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Related posts: