|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘अण्णांच्या’ खेळीने ‘बापुंना’ लगाम

‘अण्णांच्या’ खेळीने ‘बापुंना’ लगाम 

सोलापूर/ श्रीकांत माळगे 

 महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडीत सभागृह नेते सुरेश पाटील व शिवसेनेचे नेते महेश कोठे या दोन अण्णांच्या खेळीने वेगळाच राजकिय रंग पहावयास मिळत आहे. सर्व विरोधकांना एकत्र करुन सत्ताधाऱयांना सत्तेपासुनदुर ठेवण्याची रणनिती आखली असली तरी सहकारमंत्री गटाच्या वाटयाला येणारे महिला बालकल्याण समिती सभापतीपद न देता सत्तेपासुन दुर ठेवण्याची रणनिती सभागृह नेते सुरेश पाटील (पालकमंत्री गटाने) आखली आहे.

  महापालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडीची प्रक्रिया बुधवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुरु झाली. महापालिकेचे नगरसचिव यांच्याकडे सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. सातही समित्यांच्या प्रत्येकी 9 या प्रमाणे 63 सदस्यांची निवड आज गुरुवारी करण्यात येणार आहे.  महापालिकेत निवडून अलेल्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक समितीवर सत्ताधारी भाजपाचे 4, शिवसेनेचे 23, काँग्रेस आणि एमआयएम प्रत्येकी एक तर अन्य एका जागेवर राष्ट्रवादी आणि बसपा यापैकी एक अशा जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाकडून सभापती पदासाठी उमेदवार ठरविण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याकडून हालचाली झाल्या असून, महापालिकेचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने भाजपाची खेळी सुरू असून, विराधी पक्ष असलेल्या शिवसेनेला यात समावून घेऊन त्यांच्यासाठी एक-दोन महत्वाच्या समित्यांसाठी हालचाली सुरू आहेत.

  पण विदय़मान परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी, बसपा यांना हाताशी धरुन सत्ताधारी भाजपला शह देभण्याची रणनिती आखली आहे. हि कायस्वरुपी नसल्याचे त्यांनी सांगत महिला बालकल्याण समिती शिवसेनेच्या सदस्या त्यांच्या भगिनी कुमूद अंकाराम यांना देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सहकारमंत्री गटाला मिळणारे हे सभापतीपद दुर ठेवण्याची खेळी असल्याची शक्यता आहे.

 भाजपकडुन स्थापत्य समितीसाठी नारायण बनसोडे यांचा सभापती पदासाठी तर विरोधक काँग्रेसकडुन विनोद धर्मा भोसले यांचे सभापती पदासाठी अर्ज दाखल केले आहे. तसेच शहर सुधारणा समिती सभापती पदासाठी पालकमंत्री गटाचे शिवानंद पाटील तर शिवसेनेकडुन गणेश वानकर, वेदय़कीय व आरोग्य समिती- भाजपकडुन संतोष भोसले, विरोधकाकडुन एमआयएमच्या सदस्या वहिदाबानो शेख, मंडय़ा व उदय़ान समितीसाठी भाजपकडुन वंदना गायकवाड तर विरोधक काँग्रसकडुन राष्ट्रवादीच्या सुनिता रोटे, विधी समितीसाठी भाजपकडुन देवी झाडबुके तर विरोधक बसपाकडुन गणेश चंद्रकांत पुजारी, कामगार व समाजकल्याण समितीसाठी भाजपकडुन पालकमंत्री गटाचे सदस्या अमर पुदाले तर विरोधकांकडुन काँग्रेसच्या वत्सला बरगंडे, विशेष महत्वाच्या असणाऱया महिला व बालकल्याण समितीपदासाठी अश्विनी मोहन राठोड तर विरोधकांकडुन शिवसेनेच्या कुमूद अंकाराम यांचे अर्ज दाखल केले आहेत. 

Related posts: