|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » भारतीय लष्कराला मिळणार नव्या तोफा

भारतीय लष्कराला मिळणार नव्या तोफा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तब्बल तीन दशकांनंतर भारतीय लष्कराला नव्या तोफा मिळणार आहेत. अमेरिकेहून दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा भारतात आणण्यात आल्या आहेत.गुरूवारी राजस्थानमधील पोखरणमध्ये या तोफांची चाचणी घेण्यात येणार आहे.

अमेरिकेहून एम 377 तोफांच्या खरेदीसाठी 2010 पासून बातचीत सुरू होती. अखेर मागील वर्षी 26 जून रोजी याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता भारत अमेरिकेकडून 145 तोफा खरेदी करणार आहे. यासाठी 2900 कोटींचा करार करण्यात आला आहे. फॉरेन मिलिटरी सेल्सच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये हा करार करण्यात आला आहे. 1980च्या दशकात भारतीय लष्करासाठी स्ववाडिश बोफोर्स तोफांची खरेदी करण्यात आली होती. मात्र या व्यवहारात अपहर झाल्याचा आरोप होता. त्यामुळे पुढील काळात लष्करी साहित्याची आणि शस्त्रात्रांची खरेदी अतिशय संशगतेने झाली. याचा मोठा फटका लष्कराच्या आधुनिकीकरणाला बसला. 2020 पर्यंत लष्कराला 169 रेजिमेंट्स 3 हजार 503 तोफा असतील, अशी योजना आहे.