|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार : बागले

कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार : बागले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी स्पष्ट केले.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बागले बोलत होते. ते म्हणाले, जाधव यांना न्याय मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. जाधव यांना पाकिस्तानने परस्पर फाशीची शिक्षा सुनावली. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय संधीचे उल्लंघन केले. मात्र, जाधव यांना वाचवण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.