|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोकुळमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती

गोकुळमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती 

कोल्हापूर :

गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करताना दूध उत्पादक व ग्राहक यांना केंद्रबिंदू मानून केलेले काम महत्वाचे आहे. दूध संघामुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. गोकुळचे हे काम आम्हाला प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघाचे संचालक उदयसिंग पाटील यांनी काढले.

 गोकुळने दूध उत्पादकांसाठी अंतिम दूध दर फरक म्हणून 93 कोटी रुपये देण्याचे जाहीर केला. या निमित्ताने राजारामबापूच्या संचालकांनी बुधवारी गोपुळ दूध संघास भेट दिली यावेळी उदयसिंह पाटील बोलत होते.

 गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व नेते महादेवराव महाडिक यांचा दूध दर फरकाच्या रूपाने 93 कोटी इतका विक्रमी दरफरक दिल्याबद्दल राजारामबापू दूध संघाच्या संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना केले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळचे संचालक मंडळ नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. दूध दर, सेवा सुविधा याचबरोबर विविध योजनांच्या माध्यमातून गोकुळ यामध्ये यशस्वी झालेला आहे. म्हणूनच भविष्यातील कोणत्याही आव्हानास गोकुळ तोंड देण्यास समर्थ आहे असे  सांगितले. यावेळी राजारामबापू दूध संघाचे संचालक बजरंग खोत, प्रशांत थोरात, अशोक पाटील, शशीकांत पाटील, उज्वला पाटील, मंगला बाबर, बबन सावंत, पोपट जगताप, गोकुळचे महाव्यवस्थापक आर. सी. शहा उपस्थित होते.