|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » एअरसेलकडून अवघ्या 57 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग

एअरसेलकडून अवघ्या 57 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध दूरसंचार कंपनी एअरसेलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा प्लॅन लाँच केला आहे. या नव्या प्लॅननुसार ग्राहकांना अवघ्या 57 रुपयांत पूर्ण वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा दिली जाणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन सर्व ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. तसेच 90 दिवसानंतर पुढील 365 दिवसांसाठी 1 पैसा/प्रति सेकंदाच्या दरात मिळणार आहे. मात्र, दिवसातील पहिला कॉल केल्यानंतर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकणार आहे. याचबरोबर कंपनीच्या या प्लॅननुसार 30 रुपयांचा टॉकटाइमही देण्यात येणार आहे. याची वैधता 60 दिवसांची असणार आहे.