|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » एसबीआयच्या नफ्यात 2.2 पटीने वाढ

एसबीआयच्या नफ्यात 2.2 पटीने वाढ 

मार्च तिमाहीत थकीत कर्जात घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

शुक्रवारी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेने मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला. बँकेने या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असून नफा 122.8 टक्क्यांनी वाढत 2,814 कोटी रुपयांवर पोहोचला. याच कालावधीत थकीत कर्जाच्या संख्येतही कमी आली आहे. चौथ्या तिमाहीत बँकेच्या एकूण थकीत कर्जात 4.24 टक्क्यांवरून घसरण होत 3.71 टक्क्यांवर पोहोचला.

2017 या आर्थिक वर्षात बँकेचा नफा 2,814 कोटी रुपये आहे,2016 च्या चौथ्या तिमाहीत बँकेला 1263.81 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचा नेट एनपीए 61,470 कोटी रुपयांवरून 58,277 कोटी रुपयांवर पोहोचला. ग्रॉस एनपीएमध्येही घसरण झाली असून 7.23 टक्क्यांवरून 6.90 टक्क्यांवर पोहोचला. चौथ्या तिमाहीत नवीन एनपीए 9,755 कोटी रुपयांचा होता.

गेल्या तिमाहीत बँकेच्या व्याज उत्पन्नात 18.2 टक्क्यांनी वाढ होत 18,070.7 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न 15,290 कोटी रुपये होते. मार्च तिमाहीत प्रोव्हिजनिंगमध्ये 8,943 कोटी रुपयांवरून वाढत 11,470 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेकडील एकूण ठेव 18.14 टक्क्यांनी वाढत 20,44,75.39 कोटी रुपयांवर पोहोचली.

Related posts: