|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पर्यायी शिवाजी पूल बांधकामाला परवानगी मिळाल्यानंतर भाजपचा आनंदोत्सव

पर्यायी शिवाजी पूल बांधकामाला परवानगी मिळाल्यानंतर भाजपचा आनंदोत्सव 

प्रतिनिधी / कोल्हापूर

पुरातत्व विभागाच्या नियमामुळे पर्यायी शिवाजी पुलाचे ठप्प झालेले बांधकाम सुरू करण्यास केंद्र सरकारने गुरूवारी परवानगी दिली. त्यामुळे आता पुलाचे काम सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सहा महिन्यात उर्वरीत 30 टक्के अपूर्ण काम सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गुरूवारी पुलाच्या बांधकामास परवानगी देण्याचा निर्णय झाल्यानंतर महानगर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष आभार मानले.

संस्थान काळामध्ये बांधण्यात आलेल्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्यामुळे पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु 70 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या मार्गतत्वानुसार ब्रह्मपुरी टेकडी हि केंदीय पुरातत्व विभागामध्ये संरक्षित वास्तू म्हणून असल्यामुळे या पुलाचे बांधकाम राखडलेले होते. 1958 साली निर्देशित केलेल्या केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या कायद्यानुसार संरक्षित स्मारके, वास्तु आणि जागाभोवती शंभर मीटर परिघात कोणत्याही प्रकारचे बांधकाम  करण्यास प्रतिबंध होता. परंतु काल दिनांक 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा कायदा अंशतः शिथिल करण्यात आला. त्यामळे देशातील 1686 ठिकाणच्या विकासात्मक कामांचा मार्ग खुला झाला.

त्यानंतर गुरूवारी आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, सुभाष रामुगडे आदींच्या नेतृत्वाखाली या निर्णयाचे स्वागत आनंदोत्सव साजरा करून करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवाजी पूल येथे दुपारी फटाके व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, आर.डी.पाटील, श्रीकांत घुंटे, सयाजी आळवेकर, सुरेश जरग, अनिल काटकर, नजीर देसाई, अशोक लोहार, राजू सासने, ऑड.संपतराव पवार, सौ किशोरी स्वामी, राजू मोरे, दिग्विजय कालेकर, सुजय मेंगाणे, यशवंत कांबळे, चंद्रमोहन कांबळे, अरुण बारामते, शारुख गाडवाले, प्रसाद मोहिते, अमित माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.