|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » तयार राहा ; वायूदल प्रमुखांचे 1200 अधिकाऱयांना पत्र

तयार राहा ; वायूदल प्रमुखांचे 1200 अधिकाऱयांना पत्र 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तयार राहा. कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावले जाईल, अशाप्रकारचे पत्र भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुसेनेच्या 1200 अधिकाऱयांना लिहिले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. धनोआ यांनी वायुसेनेतील वाढता भेदभाव आणि लैंगिक शोषणाच्या वाढत्या प्रकरणांचाही उल्लेख केला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये धोका वाढण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडील कमी साधन-सामुग्रीच्या जोरावर कमी वेळात मोठय़ा ऑपरेशनसाठी तयार राहण्याची गरज आहे. तसेच आपला प्रशिक्षण कार्यक्रमही याचदृष्टीने चालवला गेला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.