|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी

आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी 

हजारो वर्षांची संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात आजही देव आहे की नाही याबाबत कायमच वाद होत असतात. देव ही संकल्पना झूठ आहे, विज्ञान हेच खरं असं नास्तिक म्हणतात. तर जगाचा गाडा देवामुळेच चालतो, असं आस्तिकांना वाटतं. आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची नवी कहाणी आता स्टार प्रवाहवर येत आहे. ‘कुलस्वामिनी’ ही नवी मालिका 22 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर प्रथमच सामाजिकöपौराणिक धाटणीची मालिका पाहायला मिळणार आहे.

अनाथ असलेल्या आरोहीची देवावर अपार श्रद्धा आहे. ती नेहमी सकारात्मक विचार करणारी मुलगी आहे. कर्मधर्मसंयोगानं, तिची भेट होते पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं प्रस्थ असलेल्या देवधर कुटुंबाशी. देवी रेणुका माता देवधर कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. मात्र, पूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्या घरात देवीला स्थान नाही. ते नास्तिक झाले आहेत. अशातच घरी आलेली आरोही या नास्तिक देवधर कुटुंबाचे विचार बदलून त्यांच्या घरात कुलस्वामिनीला स्थान मिळवून देते का? त्यासाठी तिला काय काय संघर्ष करावा लागतो? त्यासाठी रेणुका मातेची तिला कशी मदत मिळते? देवधर कुटुंबात रेणुका मातेचा प्रवेश होतो का? असं या मालिकेचं कथानक आहे. आस्तिक-नास्तिक संघर्ष असलेल्या या मालिकेत रेणुका मातेची महती देणारे काही चमत्कार पहायला मिळतात का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्टार प्रवाहनं कायमच उत्तम आशयाविषय असलेल्या मालिका सादर केल्या आहेत. सकस कथा, नवा विचार, उत्तम निर्मितीमूल्ये आणि उत्तम स्टारकास्ट ही स्टार प्रवाहच्या मालिकांची वैशिष्टय़ं आहेत. ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतही आस्तिक-नास्तिकतेच्या संघर्षाची अनवट कहाणी मांडली जाणार आहे. उत्तमोत्तम मालिका केलेल्या पॅम्स क्लब या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. डॉ. गिरीश ओक, संग्राम साळवी, रश्मी अनपट, प्रसाद जवादे, किशोरी आंबिये, प्रशांत चौडप्पा, हर्षा गुप्ते, प्रसाद पंडित, आशिष कापसीकर अशी उत्तम स्टारकास्ट या मालिकेत आहे. गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. या सेरिअलच्या निमित्ताने संग्राम-रश्मी ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवर 22 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

Related posts: