|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » तालिबानने केलेल्या हल्ल्यात 20 पेक्षा अधिक पोलिसांचा मृत्यू

तालिबानने केलेल्या हल्ल्यात 20 पेक्षा अधिक पोलिसांचा मृत्यू 

कंदहार

: अफगाणिस्तानच्या अशांत जाबुल प्रांतात रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी अनेक सुरक्षा चौक्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात कमीतकमी 20 अफगाण पोलीस कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली असून मदतीसाठी ते वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क करू शकत नसल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमाकडून सांगण्यात आले. या हल्ल्याला तालिबानच्या ‘स्प्रिंग ऑफेन्सिव्ह’ रणनीतिचा हिस्सा मानले जात आहे. याआधी एप्रिल महिन्यात देखील तालिबानने अफगाण लष्करी तळावर मोठा हल्ला चढविला होता. या हल्ल्यात 15 जण जखमी झाल्याचे जाबुल प्रांताचे गव्हर्नर बिस्मिल्ला अफगाणमल यांनी सांगितले. तालिबानने आपल्या वेबसाईटवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

याआधी देखील तालिबानने आपण अफगाण सरकारवरील हल्ले वाढवू असे जाहीर केले होते. तालिबानद्वारे हल्ल्यांमध्ये वाढ करण्यात आल्यानंतर अमेरिका नवे अफगाण धोरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार नाटो तेथे अधिक सैनिक तैनात पाठविण्याचा विचार करत आहे.

Related posts: