|Sunday, November 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अमेरिकेच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

अमेरिकेच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी 

सेऊल

 अमेरिकच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करत आहे. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. बीबीसीनुसार उत्तर कोरियाने रविवारी कमी अंतर क्षमतेच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या नव्या चाचणीमुळे कोरियन उपखंडातील तणावात आणखीन भर पडणार आहे. एक आठवडय़ापूर्वीच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. या चाचणीनंतर अमेरिकेने कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या चाचणीवेळचे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असल्याचे उत्तर कोरियाकडून सांगण्यात आले होते. मागील सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र चाचणीवरून इशारा दिला होता. अमेरिकेने उत्तर कोरियाविरोधात कारवाईच विचार चालविला असून चीन आणि रशियाने कोणत्याही कारवाईला विरोध केला आहे.

Related posts: