|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » बिटकॉईनवर सरकारी नियंत्रण

बिटकॉईनवर सरकारी नियंत्रण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

बिटकॉईन या आभासी चलनाबाबत सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर या आभासी चलनाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बिटकॉईनच्या माध्यमातून भारतात लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होईल अशी सरकारला भीती आहे. भारतात जास्त रिटर्न देण्याची लालच दाखवित नागरिकांना फसविण्याच्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. वॉन्नाक्राय या रॅम्सनवेअरच्या माध्यमातून सायबर हल्ला होत खंडणी मागण्यात आल्याने सरकार आता जागे झाले आहे.

बिटकॉईनच्या वापराबाबत कोणती नियंत्रणे हवीत यासाठी नागरिकांकडून 31 मेपर्यंत अर्थ मंत्रालयाने मते मागितली आहेत. आरबीआयने तत्काळ निर्णय घ्यावा असा सरकारचा प्रयत्न आहे. भविष्यात कोणतीही आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास त्यावेळी योग्य ती पावले उचलण्यात येतील. भारतात आभासी चलनाला मान्यता द्यावी अथवा बंदी घालण्यात यावी असे दोन पर्याय आहेत. बिटकॉईनला परवानगी दिल्यास कायदेशीर करण्यात येईल. ग्राहकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यात येतील.

 

Related posts: