|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नालेसफाई 78. 47 :झाल्याचा पालिकेचा दावा

नालेसफाई 78. 47 :झाल्याचा पालिकेचा दावा 

यंदा पाऊस वेळेवरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे महानगरपालिकेद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरु आहेत. मे महिन्याच्या तिसल्ल्या आठवडय़ाच्या अखेरीस मोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे 78.47 टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण 59.28 टक्के एवढे होते. छोटय़ा नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरु आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील, असा दावा  महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक श्री. प्रकाश कदम यांनी केला आहे.

महापालिका क्षेत्रातील मोठय़ा नाल्यांच्या सफाईद्वारे साधारणपणे 1 लाख 77 हजार 766 मेट्रीक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी 20 मे 2017 पर्यंत सुमारे 1 लाख 39 हजार 485 टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. याचाच अर्थ 20 मे 2017 पर्यंत नालेसफाईची कामे 78.47 टक्के एवढी झाली आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण 1 लाख 77 हजार 818 मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून न्यावयाचा होता. यापैकी गेल्यावर्षी श्मेश् च्या तिसल्ल्या आठवडय़ाच्या अखेरपर्यंत मोठय़ा नाल्यांमधून सुमारे 1 लाख 5 हजार 403 मेट्रीक टन एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला होताय म्हणजेच गेल्यावर्षी हे प्रमाण 59.28 टक्के एवढे होते.

मे च्या तिसल्ल्या आठवडय़ाच्या अखेरपर्यंत बफहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर विभागातील मोठय़ा नाल्यांमधून 9 हजार 901 मेट्रीक टन (58.19 टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण 42.17 टक्के एवढे होते. यावर्षी पश्चिम उपनगरांमध्ये 78 हजार 178 मेट्रीक टन (78.73 टक्के)य तर पूर्व उपनगरांमध्ये 51 हजार 406 मेट्रीक टन (83.65 टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये 67.06 टक्केय तर पूर्व उपगनरांमध्ये 53.03 टक्के एवढे होते. तसेच मिठी नदीमधील गाळ काढून व वाहून नेण्याचे काम देखील प्रगती पथावर असून 20 मे 2017 पर्यंत 66.10 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशीही माहिती श्री. प्रकाश कदम यांनी दिली आहे.

छोटय़ा नाल्यांच्या सफाई कामांबाबत माहिती देताना श्री. कदम यांनी सांगितले की, छोटय़ा नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात आहेत. छोटय़ा नाल्यांच्या सफाईसाठी 3 लाख 70 हजार 954 मनुष्य दिवसांचा (Man Days)य तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईसाठी (Road Side Drains / Water Entrances) 2 लाख 41 हजार 546 मनुष्य दिवसांचा ((Man Days)  वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे करताना गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यदिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. ही कामे देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या गतीने प्रगतीपथावर आहेत

Related posts: