|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ाला भेडसावते बेशिस्त पार्किग व्यवस्था

फोंडय़ाला भेडसावते बेशिस्त पार्किग व्यवस्था 

महेश गावकर / फोंडा

रस्ता वाहतूकीला सर्वाधिक पसंती दिली जाते म्हणुनच म्हणतात ना जीवन कंटाळवाणे वाटू लागले की ‘चलो लॉग डायव्ह पे चलते है’ असे म्हणतात. पण देशी पर्यटकाना फोंडा तालुक्यातील स्पाईस फार्मची सैर करण्यात येताना नाकीनऊ येते. याचे मुख्य कारण म्हणजे फोंडा शहर परीसर व उसगांव पुलावर होणारी वाहतुक कोंडी व बेशिस्त पार्कीग व्यवस्था.

  कुर्टी फोंडा येथील बेतोडा बगल रस्त्यावर बेकायदेशीररित्या पार्क करून ठेवलेल्या मालवाहू ट्रक बेशिस्त रित्या वन वे रस्त्यावर दोहोबांजूनी पार्क करून ठेवले जातात याला आळा घालण्यासाठी वाहतूक खात्या अंतंर्गत पार्किग टर्मिनल सोय उपलब्ध करून द्यावी व असे प्रकार आवाक्यात आणावे असा सुर या बाजूने प्रवास करणारे करत आहे.

दुभाजक असूनही दोहोबांजूनी सर्रास ट्रक पार्किग

दिवसेंदिवस जटील बनत चाललेल्या या प्रकाराला सरकारने दखल घ्यावी. रस्त्यावर दुभाजक असुनही तिथे दोन्ही बाजूने मालवाहू ट्रक पार्क करून ठेवले जातात. याची तात्पुरती कारवाई केली जाते, यावर कायम तोडगा काढण्याचे कोणालाही वाटत नाही यावरून कुठे तरी पाणी मुरते असा विचार पडल्यावाचून राहत नाही.कारण लागलीच काही अंतरावर दररोज वाहतूक अधिकारी चलन फाडण्यात मग्न असतात व या प्रकारावर कानाडोळा करताना दिसतात.

ट्रक टर्मिनलची नितांत गरज

फोंडा तालुका हा बेतोडा, कुंडई, मडकई औद्योगिक वसाहत व उसगांव औद्योगिक क्षेत्र यांच्या मध्यावर्धी विस्तारलेला आहे. यामुळे मालवाहू अवजड वाहनांची रेलचेल दररोज असते. बहुतेक ट्रान्सपोर्ट ऑफिस या परिसरात थाटलेली आहे. मालवाहू ट्रकांचा रोडा जास्त असल्याने पेट्रोल डिझेल स्वस्त दरात  मिळत असल्यानेमुळेही ट्रकवाहने पूरक साठा करून घेण्यासाठी वर्दळ असते. फर्मागुडी बायपास रस्त्यावर बहुतेक ट्रान्सपोर्ट ऑफिस असल्याने वाहतूक ट्रक वाल्याचा रोडा त्याबाजूने जास्त असतो. बहुतेक गाडय़ाचे दुरूस्तीकाम करणारी दुकाने त्याबाजूला जास्त आहेत. याकारणास्तव पार्कीग व्यवस्थेचा भठयाबोळ झालेला आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता हे चित्र पहायला दिसते. राष्ट्रिय महामार्ग रूंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे रस्त्यावर चिखल माजलेला दिसून येतो.

वाहनचालक जखमी झाल्याच्या अनेक घटना

उसगांवमार्गे वाहतुक करणाऱया दुचाकी चालकांना अपघात घडताना दिसतात. काही किरकोळ जखमा, हात पाय तुटलेल्या घटनाही घडलेल्या आहेत नेमक्या या जन्क्शनवर पोलिस दंड (तालांव) देण्यासाठी हजर असतात यामुळेही गडबडून दुचाकी चालक घसरून पडलेल्या घटना ऐकीवात येतात.फोंडा शहराला पार्कीग समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. बेशिस्त पार्क ठेवलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नाही.

आल्मेदा हायस्कुल परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच

आल्मेदाहायस्कूल परिसरात वाहतूक कोंडी नेहमीचीच झालेली आहे, दुपारच्या वेळी वाहतूक खोळंबते याला उपाय म्हणून काही वर्षापूवी भुयारी मार्ग काढण्यात आला होता पण याचा उपयोग लोक करताना दिसत नाही. या ठीकाणी फ्लायओव्हर बसवून सेवा करावी अशी काही पालकांची मागणी आहे. गजबजलेले शहरात पार्कीग चे सर्व नियम धाब्यावर बसवून इमारती बांधताना परवाने दिले जातात. त्यावेळी नगर नियोजन खाते मुग गिळून गप्प बसतात.

फोंडा तालुक्यातील खांडेपार पुलाची समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. उसगांव भागांत प्रवास करणाऱयासाठी ही एक डोकेदुखी बनलेली आहे. वाहतुक खात्यामार्फत याठिकाणी चोख कामगिरी बजावताना दिसत नाही. नवीन   पुलाची बांधणी कुर्म गतीने सुरू आहे. वाहतूक अधिकारी नावापुरते हजेरी लावताना दिसतात. याकामी सरकारने लक्ष घालावे असे याबाजुने वाहतुक करणाऱया ग्राहकाची मागणी आहे. यासाठी फोंडय़ातील रस्ते वाहतुकीची सुधारणा करण्यसाठी चोख पावले उचलण्याची गरज आहे.