|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » लवकरच गुगलचे नवे ऍप येणार ; सुंदर पिचाईंकडून घोषणा

लवकरच गुगलचे नवे ऍप येणार ; सुंदर पिचाईंकडून घोषणा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नुकत्याच पार पडलेल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नव्या गुगल ऍपची घोषणा केली आहे. ‘गुगल लेन्स’असे या ऍपचे नाव असून या ऍपमुळे मोबाईलच्या कॅमेऱयाची व्याख्याच पूर्णपणे बदलली जाणार आहे.

या ऍपमध्ये कम्प्युटर व्हिजन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आह. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱयामध्ये एआय तंत्रज्ञान येणार आहे. एखाद्या फोटोबाबत तुम्हाला काही माहिती हवी असेल तर गुगल लेन्स वापरा. गुगल लेन्स सुरू करताच तुम्ही काढलेला फोटो स्कॅन होईल आणि त्या फोटोसंबंधी सर्व माहिती एका क्षणात तुमच्या मोबाईल स्क्रिनवर दिसेल. त्यामुळे तुमच्या मोबाइलचा कॅमेरा आता फक्त कॅमेरा राहणार नाही तर तुम्हाला फोटो कशासंबंधी आहे याचीही माहिती देईल.असा कंपनीचा दावा आहे.