|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्या कभी अंबरसे सुर्य बिछडता हैं, क्या बीन बाती….

क्या कभी अंबरसे सुर्य बिछडता हैं, क्या बीन बाती…. 

प्रतिनिधी/ सातारा

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्वभावानुसार राजकारण हे त्यांचे श्रेत्रच नव्हे, यावर सारे उदयनराजेप्रेमी ठाम आहेत. छत्रपती शिवरायांचे वंशज, साताऱयाचे महाराज या सगळय़ाच्यापुढे जाऊन सामान्य लोकांचे तारणहार, त्यांच्यात रमणारे, मित्रांचे मित्र, दिलदार-बिनधास्त अशा अनेक उपाध्यांसाठी उदयनराजे हे त्यांच्या प्रेमींमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. दरम्यान, सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल असून अद्याप जामीन मंजूर न झाल्याने सातारकर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

प्रत्येकच कार्यकर्त्याला आपल्या नेत्याविषयी प्रमाणापेक्षा जास्तच प्रेम असते, हे भारतीय राजकारणाने दाखवून दिले आहे. दाक्षिणात्य राजकारणांत हे प्रमाण अधिक असले तरी महाराष्ट्रात हे सारं काही मर्यादित आहे. साताऱयाचे खासदार उदयनराजे हे राजकारणात असले तरी लोकप्रतिनिधी-राजकारणी ही त्यांची ओळखच नव्हे… दिलदार राजानं आपल्या गावात कसं तोऱयात चालावं. आपल्या लोकांवर कसं भरभरून प्रेम करावं. जनतेनंही त्यांच्या त्या कॉलर उडवण्यावर टाळय़ांचा कडकडाट करावा. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ज्या मंडळात ‘आया हैं राजा’ किंवा ‘मैं हू डॉन’ गाणं वाजतंय, तिथल्याच गर्दीत महाराज आहेत हे ओळखावं…. असं हे राजे व त्यांच्या प्रेमींमधलं नातं आहे.

परंतु गुन्हा दाखल होऊन जामीन नाकारल्यापासून प्रेमींना महाराजांचं दर्शन न झाल्यानं सगळेच अस्वस्थ आहेत. बरं कुठं काय बोलावं तर कायदेशिर घोटाळा होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे अनेकजण सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागलेत. सोमवारी ‘बाहूबली 2’ मधील क्या कभी अंबरसे सुर्य बिछडता हैं, क्या बीन बाती…. या गाण्यावर उदयनराजेंच्या फोटोंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक ग्रुपवर या व्हिडिओला पसंती मिळत असून काही तासांत हजारो हिटस् मिळाल्या आहेत.

महाराजांच्या राजबिंडय़ा एन्ट्रीची सोशल मीडियावर प्रतीक्षा

राजकारण, कायदेशिर बाबींचा आदर आहे; पण उदयराजेंवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्हाला कोणीच अडवू शकत नाही, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत असून महाराजांच्या राजबिंडय़ा एन्ट्रीची सोशल मीडियावर प्रतीक्षा व्यक्त होत आहे.

Related posts: