|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » मेजर गोगोईंचा निर्णय अनैतिक आणि अयोग्य : दिग्विजय सिंह

मेजर गोगोईंचा निर्णय अनैतिक आणि अयोग्य : दिग्विजय सिंह 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱया जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक तरूणाला जीपच्या समोर बांधणाऱया मेजर नितीन गोगोई यांच्या निर्णयाबद्दल सध्या देशभरात परस्परविरोधी मते व्यक्त होताना दिसत आहेत. या वादात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विज सिंह यांनीदेखील उडी घेतली आहे. तरूणाची ‘मानवी ढाल’करण्याचा मेजर गोगोई यांचा निर्णय अनैतिक आणि अयोग्यच होता. या कृतीचे समर्थन करता येणार नाही, असे मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.

 

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात गेल्या महिन्यात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती.बडगाम जिह्यात दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर फारूख अहमद दार युवकाला बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सैन्याच्या या कृतीबद्दल अनेक मतमतांतरे पाहायला मिळत होती. मात्र, दिग्विजय सिंह यांनी ही कृती पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.