|Sunday, February 23, 2020
You are here: Home » उद्योग » एचसीएलकडून समभागांची पुनर्खरेदी

एचसीएलकडून समभागांची पुनर्खरेदी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची दिग्गज भारतीय कंपनी एचसीएल टेक्नोलॉजीसने समभाग पुनर्खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्तमान व्यवहार्य किमतीवर 17 टक्के प्रीमियम देत कंपनी प्रति समभागासाठी 1000 रुपये अदा करणार असल्याची माहिती कंपनीकडून नियामकाला देण्यात आली आहे.

या पुनर्खरेदी व्यवहाराचे एकूण मूल्य 3,500 कोटी रूपयांचे असणार आहे. यात 31 मार्च 2016 साली संपलेल्या आर्थिक वर्षातील राखीव निधीच्या 13.62 टक्के  तर पूर्णतः पेड-अप प्रकारातील समभागाच्या 16.39 टक्के इतकी ही रक्कम  आहे. सध्या एचसीएलच्या समभागाचे भांडवली बाजारातील मूल्य 852.35 रुपयांवर पोहोचले आहे. 25 मे या निर्धारित नोंदणी तारखेला समभागधारकांना प्रस्तावपत्र पाठवण्यात येणार असल्याचे एचसीएलकडून सांगण्यात आले आहे. मात्र पुनर्खरेदी योजनेची आरंभ आणि समाप्तीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ताळेबंदातील अतिरिक्त तरलता नफा आणि पुनर्खरेदीच्या माध्यमातून समभागधारकांना अदा करण्यास भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यावर सध्या चांगलाच दबाव आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रमांक एकची कंपनी टीसीएसने या महिन्याच्या आरंभीच पुनर्खरेदीविषयक 1600 कोटी रूपयांची  मेगा-योजना जाहीर केली होती. तर त्या खालोखालची कंपनी इन्फोसिसनेही या वित्तवर्षात 13,000 कोटी रूपयांच्या लाभांश वाटपासह पुनर्खरदीच्या माध्यमातून समभागधारकांना हस्तातंरित करण्याची योजना आखली आहे.

Related posts: